उल्हासनगर : एका मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बोगस डॉक्टरवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र पालिका बोगस डॉक्टरांकडे बघ्याची भूमिका घेत असून किती जणांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा सवाल केला जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ पंजाबी कॉलनीतील एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीला एका वर्षापूर्वी सर्दी व खोकल्याचा त्रास झाला होता. मुलीने परिसरातील प्रवेश शर्मा नावाच्या डॉक्टरकडून औषध घेतले. मात्र तब्येत बिघडल्याने, तिला क्रिटीकेअर हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती केले. उपचार सुरू असतांना मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आई-वडीलांनी पोलिसात धाव घेतली. डॉ. प्रवेश शर्मा यांच्या डॉक्टरीच्या प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे माहिती मागितली. कौन्सिलने प्रवेश शर्मा नावाच्या डॉक्टरांची नोंद नसल्याचे लेखी सांगितल्यावर, पोलीस अधिकारी योगेश गायकर यांच्या फिर्यादीवरून डॉ. शर्मा विरुद्ध मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी शहरातील बोगस डॉक्टरांची झाडाझडती घेतली. रिजवानी यांनी चार डॉक्टरांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी एका वर्षाच्या कालावधीत एकाही डॉक्टर विरोधात कारवाई केली नाही. वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवानी यांनीही बोगस डॉक्टरांविरोधात उघडलेली कारवाई थांबवल्याने, चर्चेला ऊत आला. याबाबत डॉ. प्रवेश शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही तो झाला नाही.पुन्हा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाटच्एका वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर महापालिकेने बोगस डॉक्टरांची झाडाझडती सुरू केल्यावे कारवाईच्या भीतीने अनेक बोगस डॉक्टर गायब झाले होते.च्कारवाई थंड पडल्याने पुन्हा बोगस डॉक्टरांचे दवाखाने सुरू झाले आहेत. बोगस डॉक्टरांवर लागलीच कारवाई करण्याच्या मागणीने जोर पडकला आहे.