- सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी ‘गट-अ’ व ‘गट-ब’ पदाच्या बदल्यांसाठी आरोग्य विभागाने सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या बदल्या ऑनलाइन अर्ज करून होणार आहे.
आता या बदल्या फुकटात आणि ऑनलाइन होणार असल्याने कोणत्याही डॉक्टरला सेटिंग लावण्याची गरज नसून मनासारख्या ठिकाणी आता बदली करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.ऑनलाइन आलेल्या अर्जांमधून सेवाज्येष्ठता यादी तयारी केली जात आहे. त्यानंतर ती प्रकाशित करून आक्षेप मागिवले जात आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ज्यांची सेवा जास्त त्यांना अगोदर प्राधान्य देऊन पोस्टिंग दिली जाणार आहे. ज्या संस्थेत, जिल्ह्यात पदे रिक्त आहेत किंवा ३ वर्षांपेक्षा जास्त दिवस एकाच ठिकाणी झालेल्या पदांची यादी शासनाने जाहीर केली आहे. ते पाहूनच अर्ज भरायचा आहे, एका डॉक्टरला बदलीसाठी १० ठिकाणे निवडता येत असल्याने या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
मानवी हस्तक्षेप झाला बंदऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे आता डॉक्टरांच्या बदलीतील मानवी हस्तक्षेप बंद झाला आहे. बदलीस पात्र, अपात्र आदी माहिती या पोर्टलवर उघड होणार आहे. त्यानुसार अंमलबजावणी होत आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आता होणार ऑनलाइन‘गट-अ’ व ‘गट-ब’ या संवगार्तील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन पद्धतीच्या बदल्यांसाठी पोर्टल तयार केले आहे. परिमंडळ उपसंचालक यांनी प्रत्येक संवर्गाची निव्वळ रिक्त व संभाव्य रिक्त पदांची माहिती अचूकपणे भरली गेल्याची पुन:श्च खात्री करून घेण्याचे आदेश आहे. यासाठी प्रशासकीय बदलीस पात्र असलेल्या या ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वत:च्या भ्रमणध्वनीद्वारे लॉगिन करून नोंदणी करणे अनिवार्य आहे.
१७ मेपर्यंत होती अर्जासाठी मुदतउपसंचालक कार्यालयांनी ऑनलाइन अर्जांची तपासणी, छाननी करून आक्षेप योग्य असल्यास २२ मेपर्यंत दुरुस्ती करून घ्यावी व संपूर्ण तपासणी व आवश्यक सुधारणा झाल्यानंतर प्रणालीद्वारे सर्व ॲप्लिकेशन लॉक करावे. प्रशासकीय कारणास्तव बदल्या ३१ मेपर्यंत करण्याचे निश्चित केल्याने त्यांची माहिती १७ मेपर्यंत भरणे अनिवार्य होते. तथापि, विनंती बदल्यांबाबत १७ मेनंतर पोर्टलवर माहिती भरण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.