सदानंद नाईक
उल्हासनगर - कोविड महामारीत फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या महापालिका डॉक्टरांचाडॉक्टर दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. महापालिका महापौर लिलाबाई अशान यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यासह वैधकीय अधिकारी डॉ. दीपक पगारे, डॉ. राजा रिजवानी, डॉ. अनिता सपकाळ आदींसह अन्य डॉक्टरांचा सत्कार महापालिकेत करण्यात आला.
कोरोना काळात डॉक्टरांनी मागील १६ महिने स्वतःचा व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालन उल्हासनगरमधील रुग्णांची दिवसरात्र सेवा केली. अशा डॉक्टरांच्या ऋणातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १ जुलै डॉक्टर दिनानिमित्त अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे व त्यांच्या पथकाने महापालिका कोविड वॉर रुम सांभाळणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान केला.
महापौर लिलाबाई अशान यांच्या उपस्थितीत व आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, आरोग्य अधिकारी डॉ दिलिप पगारे, डॉ. राजा रिजवानी, डॉ. अनिता सपकाळे, डॉ. भुषण ,डॉ. जॉन सहा आरोग्य केंद्राचे डॉक्टर तसेच उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टरांचे पुष्प देऊन व केक कापून डॉक्टर दिन साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केलं आहे.