ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोव्हीड रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन आज सकाळपासून सुरु केले आहे . या सर्व कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेच्या वतीने पुन्हा एकदा कामावरून काढून टाकण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. सुमारे ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रशासनाकडून मात्र अद्याप या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आलेली नाही.प्रशासनाकडून अचानकपणे कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.द रम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर थोड्याच वेळात ग्लोबल रुग्णालयात येणार असून ते या सर्व कर्मचाऱ्यांची भेट घेणार आहेत. कोव्हीडची लाट ओसरत असल्याने या काम बंद आंदोलनाचा फारसा परिणाम जाणवत नसला तरी भविष्यात तिसरी लाट आल्यास याच कर्मचाऱ्यांची मदत लागणार असल्याने आमच्यावर हा अन्याय असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांचं पुन्हा काम बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 12:02 PM