शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डॉक्टरांनी माणूस बनावे : संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे कल्याणमध्ये आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 6:17 PM

पूर्वी डॉक्टरांना देव मानत असत. मात्र, आता डॉक्टरांना देव मानण्याचा काळ गेला. आता डॉक्टरांविषयी समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. ते दूर करण्यासाठी आधी डॉक्टरांनी माणूस बनून रुग्णाकडे बघावे, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले. कल्याणमधील वायले नगर परिसरातील 'श्वास' या खाजगी रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देकल्याणमधील वायले नगर परिसरातील 'श्वास' या खाजगी रुग्णालयाचे उद्घाटन -संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आजारी पडणे म्हणजे खूप खर्चिक काम झाले

कल्याण : पूर्वी डॉक्टरांना देव मानत असत. मात्र, आता डॉक्टरांना देव मानण्याचा काळ गेला. आता डॉक्टरांविषयी समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. ते दूर करण्यासाठी आधी डॉक्टरांनी माणूस बनून रुग्णाकडे बघावे, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले. कल्याणमधील वायले नगर परिसरातील 'श्वास' या खाजगी रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. भामरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे खासदार कपिल पाटील उपस्थित होते.

व्यवसाय म्हणून डॉक्टरी पेशाकडे बघणाऱ्या डॉक्टरांचे डॉ. भामरे यांनी चांगलेच कान टोचले. धंदा म्हणून या पेशाकडे बघू  नका. डॉक्टरांनी रुग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने काम करावे. सध्या आजारी पडणे म्हणजे खूप खर्चिक काम झाले आहे. त्यामुळे बऱ्याच वेळी सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्यसेवेला मुकावे लागते. चांगली वैद्यकीय सेवा व सुविधा ही समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोचविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. त्याबाबत लवकरच केंद्र सरकारकडून आरोग्य योजना आणणार आहे, अशी माहिती डॉ. भामरे यांनी दिली. खासदार कपिल पाटील यांची मुक्तकंठाने स्तुती करताना मित्र असावा, तर कपिल पाटील यांच्यासारखा, असे कौतूकही त्यांनी केले.

रुग्णालय हे कत्तलखाना होऊ नये, अशी अपेक्षा खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. सुभाष भामरे यांचा आदर्श घेऊन समाजसेवा म्हणून डॉक्टरांनी व्यवसाय करावा, असा सल्ला त्यांनी दिला. कल्याण शहरातील नागरीक आजारीच पडू नयेत. मात्र, पडल्यास या रुग्णालयाच्या माध्यमातून आजारी रुग्णांना लवकरात लवकर चांगले उपचार मिळून ते ठणठणीत बरे होतील, असा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड, महापालिकेतील भाजपचे गटनेते वरुण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणDefenceसंरक्षण विभागthaneठाणे