शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

जव्हारमध्ये पाणलोटची कामे कागदोपत्रीच

By admin | Published: November 14, 2015 11:31 PM

रोजगारा अभावी आदिवासींची वणवण थांबावी तसेच त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा या उद्देशाने शासन कृषी विभागाच्या अंतर्गत आणि पाणलोटच्या माध्यमातून कोट्यावधीची कामे केली जातात.

मोखाडा : रोजगारा अभावी आदिवासींची वणवण थांबावी तसेच त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा या उद्देशाने शासन कृषी विभागाच्या अंतर्गत आणि पाणलोटच्या माध्यमातून कोट्यावधीची कामे केली जातात. परंतु ही कामे केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात काहीच हालचाल दिसत नाही. यामुळे आदिवासींचा विकास खुंटला आहे.पाणलोटच्या माध्यमातून जव्हार मधील गावपाड्यात २०१३-१४ ते २०१५-१६ च्या दरम्यान कामे करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात कामे झालीच नसल्याने आदिवासींमध्ये संताप आहे. २०१३-१४ मध्ये पिंपळशेत येथे मजगी योजना एकुण सहा गटामध्ये व क्षेत्र १६, ४५ कामे करण्यात आली आहेत व यासाठी १५,२,३३२ रू खर्च झाला आहे . तर ल्युज बोल्डर योजने अंतर्गत गट क्रमांक ३ ते ५ दरम्यान करण्यात आली आहेत व यासाठी ६,३९,३०९ रू खर्च झाला आहे वाळवंडा येथे मजगी योजना एकूण चार गटामध्ये व श्रेत्र ७ व एकूण खर्च ३,७४,९४४ रू झाला आहे ल्युज बोल्डर योजना १ ते ९ गटामध्ये क्षेत्र ३५८ मध्ये कामे करण्यात आली आहेत व यासाठी २३,९४,०५६ खर्च झाला आहे.मेढा येथे मजगी योजना एकूण २७ गटामध्ये क्षेत्र ५५,४८ व यासाठी २७,०५,७८२ रुपये खर्च झाला आहे ल्युज बोल्डर योजना १ ते १० गटामध्ये क्षेत्र ४१७ व यासाठी २८,०२,२१८ रु खर्च झाला आहे. किरमिरा येथे मजगी योजना एकूण २७ गटामध्ये व श्रेत्र ५६,६१ व २९,८१,२९६ खर्च झाला आहे ल्युज बोल्डर योजना १ ते १७ गटामध्ये क्षेत्र ३४४ व २२,१९,१५० रु खर्च झाला आहे. तलासरी ल्युज बोल्डर योजना १ ते १७ क्षेत्र १३६ मध्ये करण्यात आले आहेत ८,६४,८५० खर्च झाला आहे. चांभारशेत येथे मजगी योजना गट क्रमांक १ ते १६ क्षेत्र २७,५५ व १४,२०,९७६ रू खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना क्षेत्र ८२ मध्ये ५८,७,३९२ रु खर्च झाला आहे. आकरे, हाडे, मजगी योजना गट क्रमांक १ ते १८ क्षेत्र ३२ ,२५ असुन यासाठी १७,०९,७४५ रु खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ ते १४ गटात क्षेत्र ५४१ असून ३२,०११,२५५ रु खर्च झाला आहे तसेच बोपदरी येथे सर्वात जास्त कामे केली असल्याचे दाखविले आहे.कारण हे गाव गुजरात बॉन्डरी लगत असल्याने जव्हार पासून खुपच अंतर आह.े येथे मजगी योजना गट क्रमांक १ ते १२ क्षेत्र ३४,७२ व यासाठी १७,२८,१३६ रु खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ ते ६ क्षेत्र २,७० मध्ये करण्यात आले असून १६३१८६४ खर्च झाला आह.े परंतु हे कामे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली नसल्याचे येथील सरपंच विनायक जाबर यांनी सांगितले २०१३-१४ मध्ये पाणलोट साठी २ कोटी२९ लाख १२ हजार ४१ रुपये खर्च झाला आहे तसेच १४-१५ च्या दरम्यान न्याहाळे येथे मजगी योजना एकूण दहा गटामध्ये क्षेत्र १६३२ मध्ये कामे करण्यात आली आहेत ३ लाख ३२ हजार रुपये खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ते ६ दरम्यान करण्यात आली आहेत व यासाठी ४ लाख ९८ हजार पाचशे रुपये खर्च झाला आहे कवलाळा येथे मजगी योजना एकुण नऊ गटामध्ये क्षेत्र १५,१२ मध्ये कामे करण्यात आली आहेत व यासाठी २ लाख ९८ हजार रुपये खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ ते ६ गटामध्ये कामे केली आहेत ४ लाख ५५ हजार रुपये खर्च आहे. झाप येथे मजगी योजना एकूण पाच गटामध्ये क्षेत्र १२,१४ मध्ये कामे केली आहेत यासाठी ३ लाख १२ हजार खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ ते ८ गटामध्ये कामे करण्यात आली असून ५ लाख १३ हजार खर्च आहे . बोपदरी येथे मजगी योजना एकुण आठ गटामध्ये १७ लाख २८ हजार ५५२ रुपये खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ते१५ गटामध्ये क्षेत्र ३५,१२ एकुण खर्च १८ लाख ३५ हजार १५२ खर्च झाला असून २०१४-२०१५ च्या दरम्यान ५७ लाख ७१ हजार ७०४ रुपये खर्च झाला आहे तसेच या कामांची माहिती दिली जात नाही कारण ती प्रत्यक्षात न करता कागदोपत्रीच केली आहेत. ग्रामपंचायतींना भेट दिली असता ती झाली नसल्याचे आदीवासींनी सांगितल्याने चौकशी झाली पाहिजे.