याबरोबरच डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजन बेडची कमतरता लक्षात घेऊन बँकेने दोन ऑक्सिजन मशिन्स डोंबिवली येथील अनिता रुग्ण सेवा केंद्रास वापरण्यासाठी दिल्या आहेत. बँकेच्या भागधारक कल्याण निधीच्या माध्यमातून देण्यात येणारा समाजमित्र पुरस्कार यावर्षी पनवेल येथील आदिवासी समाजातील कर्णबधिर व गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या रामचंद्र कुरूळकर बहूद्देशीय शिक्षण संस्थेला देण्यात आला. धनादेश, मानपत्र व बँकेचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय तसेच नानीन्यपूर्ण काम करणाऱ्या संस्थेस अथवा कार्यकर्त्यास प्रतिवर्षी सहकार मित्र पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधी संघ या संस्थेला प्रदान करण्यात आला. धनादेश, मानपत्र व बँकेचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डोंबिवली बँकेकडून रा.स्व. संघ जनकल्याण समितीस कार्डीअॅक अॅम्ब्युलन्स प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:37 AM