शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

Dombivali: डोंबिवलीतील रासरंगमध्ये चौथ्या दिवशी गरबा रसिकांची अलोट गर्दी

By मुरलीधर भवार | Published: October 19, 2023 5:31 PM

Dombivali Navratri 2023: कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित भव्य दांडिया रासरंग - २०२३ उत्सवाला डोंबिवलीकरांसह गरबा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

- मुरलीधर भवारडोंबिवली - कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित भव्य दांडिया रासरंग - २०२३ उत्सवाला डोंबिवलीकरांसह गरबा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्सवात बुधवारी गरबा रसिकांनी न भूतो अशी गर्दी केली. यावेळी गरबा नृत्याचा अनुभव घेण्यासाठी विशेष मुलांनीही उपस्थिती लावली. तसेच कला क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना यावेळी नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डी.एन.सी. शाळेच्या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित भव्य दांडिया रासरंगचे आयोजन करण्यात आले आहे. नैतिक नागदा आणि त्यांचे सहकलाकार या ठिकाणी उत्कृष्ट असे सादरीकरण करत आहे. घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेल्या या नवरात्रोत्सवाला गरबा रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यामुळे उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या उत्सवाला अधिक रंगत चढत आहे. नैतिक नागदा यांच्या सुरांनी आणि ढोलकवादनाने उत्सवाची रंगत वाढविली. पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या तरुण मित्र मंडळींनी कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवत मनसोक्त गरबा नृत्याचा आनंद लुटला. आपल्या उत्कृष्ट नृत्याने कार्यक्रमाच्या परीक्षांची मने जिंकणाऱ्या गरबा रसिकांना कार्यक्रमाच्या शेवटी बक्षिसांचेही वाटप करण्यात आले.

सन्मान स्त्री शक्तीचाउत्सवाच्या पहिल्या दिवशी डोंबिवली गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणारी बॉक्सिंग चॅम्पियन ईशा भगत या नवदुर्गांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दुसऱ्या दिवशी डोंबिवली शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरुर आणि गेल्या पंधरा वर्षापासून शिक्षण सेवेत कार्यरत असलेल्या उन्नती पतंगराव यांना तर तिसऱ्या दिवशी यशस्वी उद्योजिका विदुला आमडेकर आणि भारती पालकर यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, चौथ्या दिवशी कलाक्षेत्रात आपले उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात संगीत क्षेत्रात आपल्या गायनाने वेगळी ओळख निर्माण केलेल्या मृदुला दाढे जोशी आणि कथक नृत्य विशारद ज्योती शिधये यांना नवदुर्गा पुरस्कार देण्यात आला.

रासरंग - २०२३ ला लाभली विशेष उपस्थितीया उत्सवाला तरुण मित्र मंडळींसह, ज्येष्ठ नागरिकांनी नैतिक नागदा यांच्या स्वरांवर आणि त्यांच्या सहकारी कलावंतांनी सादर केलेल्या वाद्यवृदांच्या तालावर गरबा नृत्याचा आनंद घेतला. यावेळी डोंबिवली येथील संतोष इन्स्टिट्यूट स्वमग्न मुलांची शाळा येथून आलेल्या काही विशेष मुलांनीही गरबा नृत्याचा आनंद घेतला. यावेळी या साऱ्यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत सुरात सूर मिसळला, आणि रासरंग कार्यक्रमाला विशेष रंग लाभला. विशेष मुलांनी या रासरंगाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुलांशी संवाद साधला.

टॅग्स :Navratriनवरात्रीdombivaliडोंबिवली