डोंबिवली: सोमवारपासून मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झालेली असतांनाच बुधवारी संध्याकाळपासून खड्यात खडी-माती टाकण्याचे काम सुरु झाले आहे. पण पावसाच्या संततधारीमुळे माती पाण्यात वाहुन गेल्याने खड्डयातील खडी रस्त्यावर आल्याने वाहतूकीचा वेग मंदावला.गुरुवारी सकाळी १०.३० नंतर दुपारी १.३० वाजेपर्यंत पूर्वेकडील इंदिरा गांधी चौक, चार रस्ता, टिळकपथ, भगतसिंग रोड आदींसह मंजूनाथ शाळेसमोरील रस्त्यावर प्रचंड कोंडी झाली होती. रिक्षा, परिवहनच्या बसेस, स्कूल बस आदींसह सर्वांनाच याचा फटका बसला. सकाळच्या सत्रातील सुटलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणा-या बस, तसेच दुपारच्या सत्रासाठी शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना या कोंडीमुळे लेटमार्कला सामोरे जावे लागले.स्कूल बसेस अडकल्याने वाहतूक पोलिसांचीही दाणादाण उडाली होती, परंतू इंदिरा गांधी चौकासह भगतसिंग रोड आणि टिळकपथ आदी ठिकाणची कोंडी बराच वेळ न सुटली नव्हती. त्यात खासगी वाहनांमुळेही अडथळयात वाढ झाली. या सर्व ठिकाणी रस्त्यांच्या खड्यांमध्ये खडी-माती टाकण्यात आली असून त्यातील माती पावसाच्या पाण्यात इतरत्र वाहुन गेली, आणि खड्यांमधील खडी बाहेर आली. त्या खडींमुळे चाकाला काही बाधा होऊ नये यासाठी ती चुकवून वाहन चालवण्याच्या वाहनचालकांच्या प्रयत्नामुळे कोंडीत अधिक भर पडली. त्यामध्ये तीन चाकी टेम्पो, दुचाकीस्वार तसेच मालवाहू नेणा-या वाहनांचा समावेश होता.काही मिनिटांच्या अवधीत सर्व ठिकाणी कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांचीही दमछाक झाली होती. त्यातच भगतसिंग रोडवर पीपी चेंबर्स नजीक दुतर्फा चारचाक्या लागल्यानेही पोलिस हैराण झाले होते. गाड्यांमध्ये वाहनचालक बसुन गाड्या पार्क करण्यात आल्याने त्या हटवतांना अथवा त्यांच्यावर कारवाई कशी करायचीहा पेच वाहतूक नियंत्रण करणा-या वॉर्डनपुढे होता. दुपारी १.३० नंतर या सर्व ठिकाणची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर आली.
डोंबिवलीत रस्त्यावरील खडयात खडी पण वाहतूक कोंडी जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 2:38 PM
सोमवारपासून मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झालेली असतांनाच बुधवारी संध्याकाळपासून खड्यात खडी-माती टाकण्याचे काम सुरु झाले आहे. पण पावसाच्या संततधारीमुळे माती पाण्यात वाहुन गेल्याने खड्डयातील खडी रस्त्यावर आल्याने वाहतूकीचा वेग मंदावला.गुरुवारी सकाळी १०.३० नंतर दुपारी १.३० वाजेपर्यंत पूर्वेकडील इंदिरा गांधी चौक, चार रस्ता, टिळकपथ, भगतसिंग रोड आदींसह मंजूनाथ शाळेसमोरील रस्त्यावर प्रचंड कोंडी झाली होती.
ठळक मुद्दे खडी रस्त्यावर पसरल्याने मंदावली वाहतूक स्कूल बसना लेटमार्क