शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

डोंबिवलीत ‘समविषम’चा नियम धुडकावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 12:43 AM

कल्याणमध्ये काही अंशी पालन : नागरिकांची खरेदीसाठी झुंबड, दुकानांसमोर मोठ्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये शुक्रवारी प्रथमच विषम तारखेच्या निकषाप्रमाणे दुकाने उघडण्यात आली. कल्याणमध्ये काही अंशी हा नियम पाळण्यात आला. मात्र, डोंबिवलीत दोन्ही बाजूंकडील दुकाने उघडण्यात आल्याने नागरिकांनी तेथे खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या दुकानांवर नियंत्रण कोण ठेवणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केडीएमसीने शुक्रवारपासून कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने समविषम तारखांनुसार उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात कंटेनमेंट झोनमधील काही दुकाने उघडल्याने त्यांना तशी मुभा कोणी दिली, असा प्रश्न उपस्थित केला गेला. तर, दुसरीकडे कंटेनमेंट झोनबाहेरील विषम तारखेनुसार कपड्याची दुकाने, चप्पलविक्रेते, विद्युत उपकरणे विकणारी दुकाने तसेच पार्सल सेवा देण्यासाठी बडी उपाहारगृहे उघडण्यात आली. काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानांची स्वच्छता गुरुवारी केल्याचे पाहायला मिळाले.

पावसाने आज उघडीप दिल्याने अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडले. पावसाळी चपला, छत्र्या, रेनकोट, गळक्या घरांवर टाकण्यासाठी प्लास्टिक, ताडपत्री खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केला होती. ताडपत्रीच्या दुकानात रांग लागली होती. दुसरीकडे काही दुकानदारांनी भीतीपोटी दुकानेच उघडली नाही. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पहिल्याच दिवशी उडाल्याने एक दिवसाआड दुकाने उघडावीत, जेणेकरून गर्दी होणार नाही, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन बासरे यांनी केली आहे. अन्यथा, पुण्याच्या धर्तीवर काही विशिष्ट वार ठरवून त्या-त्या वारीच दुकाने उघडण्याची वर्गवारी तयार करावी. त्यामुळेही गर्दी टाळली जाऊ शकते. याचा विचार प्रशासनाने करावा, असे त्यांनी सुचवले.उपाहारगृहांमध्ये पार्सलसाठी गर्दीडोंबिवलीत नियमाला बगल देत सरसकट सगळीच दुकाने उघडण्यात आली होती. तेथील उपाहारगृहांतील काउंटरवर पार्सल घेण्यासाठी गर्दी झाली. अनेक दिवसांनंतर इडलीचटणी, वडासांबार, मेदूवड्याचा आस्वाद अनेकांनी घेतला. दिलेल्या वेळेपलीकडेही काही दुकाने सुरू असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सुरुवात केली होती.