- अनिकेत घमंडीडोंबिवली - मध्य रेल्वेच्याडोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्यासह चालवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.
त्यासंदर्भात एक खुली ऑनलाइन निविदा प्रकाशित करण्यात आली असून ती १२ ऑक्टोबर रोजी दु.३:०० वाजता बंद होईल. दहा वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी ते नॉन-फेअर रेव्हेन्यू उत्पन्न मॉडेल अंतर्गत असेल.
प्रस्तावित सिने डोम हा ग्राहक,अभ्यागत, पाहुण्यांसाठी जेवण,नाश्ता, पेय्यांसह नवीनतम चित्रपट प्रदर्शित आणि माहितीपट आणि इतर सामग्री इ.सह चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था असेल. मात्र, कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. सिने डोमचे व्यवस्थापन निविदाकार स्वतःच ऑपरेटर करतील. गर्दीचे व्यवस्थापन करणे ही जबाबदारी परवानाधारकाची असेल असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱयांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
प्री-फॅब्रिकेटेड सिने डोमची स्थापना, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन ही जबाबदारी पूर्णत: परवानाधारकाची असेल आणि त्यासाठी लागणारा खर्च परवानाधारकाला करावा लागेल (त्यात उभारणीचा खर्च, प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम संबंधित वस्तू, संरक्षा आणि सुरक्षा, आवश्यक सुविधा, केबल टाकणे, विद्युत कनेक्शन, वीज वापर शुल्क, वीज जमा आणि इतर प्रासंगिक खर्च इ. समावेश आहे). प्री-फॅब्रिकेटेड सिने डोमच्या उभारणीसाठी आणि ऑपरेशनसाठी वरील सर्व खर्च आणि आनुषंगिक खर्च परवानाधारकाने उचलावा लागेल.
निविदाकार स्थानाच्या आवश्यकतेनुसार प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारेल. या उद्देशासाठी, ते स्वीकृती पत्र जारी केल्यापासून ३० दिवसांच्या आत सक्षम प्राधिकरणाकडून आवश्यक मंजुरीसाठी तपशीलवार लेआउट योजना/डिझाइन सादर करेल. आवश्यकतेनुसार कोणतेही बदल सुचविण्याचा अधिकार रेल्वेने राखून ठेवला आहे. मात्र, कायमस्वरूपी बांधकाम करता येणार नाही. वरील प्रत्येक ठिकाणी एकूण क्षेत्रफळ सुमारे ५,००० चौ.फू.
प्रतिवर्षी राखीव किंमत खालीलप्रमाणे आहेडोंबिवली – रु. ४७,८५,४००/-जुचंद्र - रु. ३५,८२,०००/- इगतपुरी – रु. १७,१०,४००/- खोपोली - रु. २३,३१,१००/- ई-निविदेत सहभागी होण्यासाठी बोलीदारांना रेल्वेच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल असे सांगण्यात आले.