डोंबिवली: साधारण पंधरा दिवसांनी ढगांच्या गडगडाटात शहरात पावसाला सुरुवात झाली असून जनजीवन दुपारनंतर काहीसे विस्कळीत झाले आहे. दुपारी 1 वाजल्यानंतर पावसाने जोर धरला असून आकाश पूर्णतः ढगाळलेले आहे. वातावरणात गारवा आला आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यापासून शहरातील हमरस्त्यावर गर्दी सुरू झाली होती, त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य पसरले असतानाच मंगळवारच्या पावसामुळे व्यापाऱ्यांचा हिरमोड केला.
सकाळपासून शहरात लहान सरी पडल्या होत्या, दुपारनंतर पावसाने जोर पकडला होता. सकाळच्या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कामगार रेल्वेने तर खासगी कंपन्यांचे कामगार देखील बस ने कामावर गेले होते. सकाळच्या सत्रातील पावसामुळे नागरिकांचे रांगेत उभे राहतात हाल झाले, त्यात बसची वाट बघताना ताटकळलेले प्रवासी हैराण झाले होते.