डोंबिवली - सततच्या वीज खंडीत होण्यामुळे नोकरदारांचे हाल सुरू असून वर्कफ्रॉम होम करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वेळेत अपेक्षित काम न देऊ शकल्याने तंबी मिळत आहे. त्यामुळे त्रस्त डोंबिवलीकर नागरिकाने त्याबाबत ट्विट करून जर अखंडित वीज पुरवठा देता येत नसेल तर नोकरदारांचे पगार, त्यांच्या होणाऱ्या रजा या महावितरणने भरून देण्याची जबाबदारी घ्यावी असे म्हटलं आहे. त्या संदर्भात सौरभ सोहोनी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनाही ट्विटमध्ये टॅग केलं आहे.
वर्क फ्रॉम होम असताना अखंड वीज पुरवठा केला जाईल असे आश्वासन महावितरणने केले होते, त्याचे काय झाले असा सवाल आयटी सेक्टरमध्ये असलेले नोकरदार करत आहेत. सातत्याने वीज खंडीत होणे, वेळी अवेळी वीज नसणे यामुळे कामामध्ये अडथळे येत आहेत. ज्या कंपन्यांनी आधी संगणक दिले होते त्यांनी कामगारांच्या अडचणींवर मात करण्यासाठी त्याना लॅपटॉप दिले, परंतु त्याचे देखील बॅकअप संपुष्टात येत असून काम करायचे तरी कसे, त्यापेक्षा कामाच्या ठिकाणी असलेले बरे पडत असल्याची प्रतिक्रिया युवकांनी दिली असून महावितरणने नोंद घ्यावी असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"
डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा
तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी
जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...