शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवा, डोंबिवली उड्डाणपुलाबाबत पालकांना धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:37 AM

पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक असल्याचे रेल्वेने घोषित केला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला नाही.

- जान्हवी मोर्येडोंबिवली  - पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल हा धोकादायक असल्याचे रेल्वेने घोषित केला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला नाही. मात्र या पुलावर वाहतूककोंडी होऊ न त्यात स्कूलबसची रखडपट्टी होत आहे. त्यामुळे पालकांना भीती वाटत असून या बसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.ओमकार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या पुलावरून स्कूलबसची वाहतूक करू नये. तसेच, अवजड वाहनांना बंदी घालून धोकादायक पूल असल्याचे फलक लावावेत, यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आहे. चव्हाण यांनी या पुलाची फाइल फेरतपासणीसाठी गेली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही, असे त्यांना सांगितले.स्कूलबसमध्ये किमान ५५ विद्यार्थी असतात. तसेच पुलाखालून रेल्वे लाइन गेली असून केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे, तर नागरिकांचाही जीव धोक्यात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल पालकांनी केला आहे. तसेच यंत्रणांनी पूल धोकादायक असल्याचा फलक लावल्यास शाळेला वाहतूक वळवण्याची सूचना करता येईल. अन्यथा ही मागणी कोणत्या आधारावर केली आहे, असे शाळेकडून विचारणा होऊ शकते.शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या पालक अपर्णा सावंत यांनी सांगितले की, हा पूल बंद करण्यात येणार होता. मात्र, प्रत्यक्षात हा पूल सुरू आहे.धोकादायक असल्यामुळे या पुलावरून अवजड वाहने नेण्यात येऊ नयेत. आमचा शाळेत गेलेला मुलगा घरी सुखरूप येईपर्यंत धाकधूक लागलेली असते. आम्ही आमच्या शाळेला वाहतूक वळविण्याची मागणी करू, पण इतर मुलांचे काय? कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज असल्याने आम्ही ही मागणी केली आहे. प्रशासनाने पुलाची डागडुजी तरी करावी. कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट आम्हाला पाहायची नाही.फुले रोड परिसरात राहणाºया पालक तृप्ती जगताप म्हणाल्या की, या पुलावरून लहान वाहनांची वाहतूक सुरू ठेवावी. मात्र, अवजड वाहने आणि शालेय बस यांची वाहतूक ठाकुर्ली पुलावर वळविण्यात यावी. पश्चिम परिसरात अनेक बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. एवढी या पुलाची क्षमता उरली आहे का, हेही पाहावे. वर्षा थळकर म्हणाल्या की, आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. फुले रोडवरून जाणाºया बसला ठाकुर्ली पूल सोयीस्कर ठरतो. मात्र, स्टेशन परिसरातील मुलांना घेऊन बस या पुलावरून जाण्याची तसदी घेणार नाहीत. त्यामुळेच सर्वच बसची वाहतूक वळवावी.उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी संजय ससाणे म्हणाले की, कोपर पुलासंदर्भातील निर्णय हे रेल्वे प्रशासन, आरटीओ आणि केडीएमसी या यंत्रणा एकत्रित घेतात. १२ टनांपेक्षा कमी वजन असलेल्या वाहनांना या पुलावर बंदी नाही. शालेय वाहने ही १२ टनांपेक्षा कमी आहेत की नाही हे सांगता येणार नाही. काही जुन्या बसचे वजन हे १२ टनांपेक्षा जास्त आहे. यासंदर्भात माहिती मागितली किंवा अभिप्राय मागतल्यास ती आम्ही देऊ.पालकांनी केला सुरक्षा उपायओमकार इंटरनॅशनल स्कूलमधील पश्चिम विभागात राहणाºया पालकांनी एक व्हॉट्सअ‍ॅप गु्रप बनवला आहे. त्यांनी पुलावरून शालेय वाहतूक करण्यासमनाई केली आहे. या पालकांनी आपल्या वैयक्तिक वाहनांचा वापर करून किंवा रिक्षाने मुलांना स्टेशनपर्यंत घेऊन येण्याचा आणि तिथून पुढे जीना उतरून पाल्याला बसमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून पश्चिमेतील विद्यार्थ्यांनी पूर्वेत बस पकडण्याससुरुवात केली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली