डोंबिवली : आॅक्टोबर हिटच्या चटक्याने नागरिक हैराण झालेले असतानाच दसऱ्याच्या दिवशी, मंगळवारी सायंकाळी शहाराला वीजपुरवठा करणाºया महापारेषणच्या एमआयडीसी येथील १०० के. व्ही. क्षमतेच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे सायंकाळी तासभर विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने सुमारे ८० हजार ग्राहकांना त्याचा फटका बसला.महापारेषणच्या पाल सबस्टेशन येथून शहरभर वीज वितरित करण्यासाठी महावितरणने आनंद नगर, बाजीप्रभू चौक आणि एमआयडीसी येथे तीन केंद्रे निर्माण केली आहेत. मंगळवारी एमआयडीसीच्या १०० के. व्हीच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे सुमारे ८० हजार ग्राहकांना त्या बिघाडाचा फटका बसला असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली. सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी खंडित झालेला वीजपुरवठा बिघाड दुरुस्त केल्यानंतर एक तासाने पूर्ववत झाल्याचे अधिकाºयांनी सांगितले.आग लागल्याची अफवा : एमआयडीसी येथील केंद्रात आग लागल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. परंतु, त्यात तथ्य नसल्याचा दावा महावितरणच्या अधिकाºयांनी केला. समस्या गंभीर असल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे या अधिकाºयाने पुढे स्पष्ट केले.
डोंबिवलीत मुख्य वीजवाहिनीत बिघाड; ८० हजार ग्राहकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 12:03 AM