- अनिकेत घमंडी
डोंबिवली: मुसळधार पावसाने डोंबिवली, ठाकुर्ली शहराला।झोडपले असून कालपासून आतापर्यंत 109 झाड उन्मळून पडली असून महापालिकेसमोर त्या झाडांची विल्हेवाट लावणे, रस्ते मोकळे करणे हे मोठे आव्हान आहे. आधीच कोरोनामुले कल्याण डोंबिवली महापालिका रेडझोन मध्ये असताना त्यावर आला घालणे हे एक आव्हान असताना आता निसर्ग चक्रीवादळाचे पडसाद या सर्व ठिकाणी उमटू लागल्याने प्रशासन हैराण झाले आहे.
109 झाड पडल्याचे कॉल आतापर्यत आले असून कदाचित तो आकडा 150 वरही गेला असण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यात गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 10.30 पर्यंत या शहरांना पावसाने झोडपून काढले. ठाकुर्ली रेल्वे स्थनाकात पूर्वेला पाणी जमा झाले असून त्यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांची कसरत होत आहे.
रेल्वे ह्दद्तीली झाड तोडून माहापालिकेच्या आवारात टाकल्याने पाणी जमा झाले असून पाण्याला जायला मार्ग नसल्याने मोठी पंचाईत झाली असल्याचे प्रत्यक्षदरशी सुनील मिश्रा यांनी सांगितले. या सह डोंबिवलीत अनेक ठिकाणी पाणी साचले होते, साडे दहानंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरीही वातावरण ढगाळ होते. वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून पुन्हा।पावसाची शक्यता वतरवण्यात आल्याने नागरिक रस्त्यावर आले असून सामान घेण्यासाठी लगबग दिसून येत आहे.