शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

डोंबिवलीकरांचा प्रवास वर्षभर खड्ड्यांतूनच?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 2:12 AM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबरमध्ये तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण व नगरसेवकांनी शहरात ४७२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या जवळपास ३८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे भूमिपूजन केले होते.

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबरमध्ये तत्कालीन राज्यमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण व नगरसेवकांनी शहरात ४७२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या जवळपास ३८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे भूमिपूजन केले होते. मात्र, त्यास चार महिने झाले तरी अजूनही एमएमआरडीएकडे या रस्त्यांचा विकास आराखडाच (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) केडीएमसीने सादर केलेला नाही. त्यामुळे या रस्त्यांची कामे प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी, येता पावसाळाच काय तर पुढील जानेवारीपर्यंत डोंबिवलीकरांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार असल्याची शक्यता दक्ष नागरिकांच्या समितीने व्यक्त केली.रस्त्यांवरील खड्डे डोंबिवलीकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या बिकट होते. यंदा पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे व वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले. केडीएमसीनेही खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या १७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून वारंवार रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र, तरीही नागरिकांना फारसा दिलासा मिळाला नाही. डोंबिवलीतील रस्ते सुधारावेत, खड्ड्यांपासून येथील नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी आ. चव्हाण यांनी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ४७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. ३८ रस्त्यांपैकी ३४ रस्ते एमएमआरडीए तर चार रस्ते केडीएमसीतर्फे केले जाणार आहेत. या रस्त्यांचे सप्टेंबरमध्ये मोठा गाजावाजा करत ठिकठिकाणी भूमिपूजन करण्यात आले. निवडणुकीनंतर या रस्त्यांच्या कामाला प्रारंभ होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य डोंबिवलीकरांची होती. मात्र, ती फोल ठरली आहे. आतापर्यंत सर्वच रस्त्यांचा डीपीआर तसेच काही रस्त्यांची प्राथमिक माहिती केडीएमसीकडून मिळालेली नसल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दक्षच्या पदाधिकाºयांना दिली.डीपीआर बनविण्यासाठी रस्त्यांचे सर्वेक्षण करणाºया कंपनीला काही ठिकाणी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी मज्जाव करत असल्याची माहिती दक्षला मिळाली आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम अजून किमान तीन ते चार महिने चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर, एमएमआरडीए निविदा मागवून कंत्राटदार निवड प्रक्रिया पार पाडणार आहे. त्यानंतर, प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. केडीएमसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाºयांची काही दिवसांपूर्वीच संयुक्त बैठक झाली. यावेळी प्रस्तावित काँक्रिटच्या रस्त्यांलगतच्या सर्व्हिस रोडचा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी या रस्त्यांच्या खर्चासंदर्भातही अनेक अडचणी येणार असल्याचे महापालिकेतील अधिकाºयांनी सांगितले. या रस्त्यांच्या एकूणच कामासाठी महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे एकीकडे एमएमआरडीए रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला तयार असली, तरी सर्व्हिस रोडबाबत अजून महापालिका अनभिज्ञ आहे, असे दक्षच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.केडीएमसीने एमएमआरडीएला महिनाभरात रस्त्यांचा डीपीआर दिला तरी, कामे सुरू होण्याची शक्यता कमी आहे. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत कामाला संधी मिळणार आहे. पुढे पावसाळ्यामुळे जून ते सप्टेंबर काम करता येणार नाही. त्यानंतर, केडीएमसीची आॅक्टोबरमध्ये निवडणूक होऊ घातल्याने सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल. त्यामुळे त्यानंतरच कामाला सुरुवात होईल. हे सगळे गृहीत धरल्यास पुढील जानेवारीपर्यंत रस्त्यांची कामे दिसू लागतील. परिणामी, डोंबिवलीकरांना येत्या पावसाळ्यातही खड्ड्यांतूनच वाट काढावी लागणार असल्याचा पुनरु च्चार दक्षने प्रसिद्धिपत्रकात केला.दक्षच्या पदाधिकाºयांची महापालिका व एमएमआरडीएच्या अधिकाºयांशी सविस्तर चर्चा झाली. ज्या रस्त्यांचा डीपीआर पूर्ण झाला आहे, किमान त्या रस्त्यांची निविदा प्रक्रि या त्वरित सुरू करून ते रस्ते लवकरात लवकर होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी दक्षतर्फे करण्यात आली. हा निर्णय धोरणात्मक असून, संबंधित प्रशासनाच्या अधिकाºयांनी याबाबत सहमती दर्शविली, तर तसा निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठक बोलविण्यात येऊ शकते, असे सांगण्यात आले.डोंबिवलीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी एमएमआरडीएने पाहणी केली आहे. त्यामुळे महापालिकेकडून जे सहकार्य करायचे आहे, ते सगळे झाले आहे. तसेच यापुढेही हवे ते सहकार्य केले जाईल.- गोविंद बोडके, आयुक्त, केडीएमसी

टॅग्स :dombivaliडोंबिवलीroad transportरस्ते वाहतूकthaneठाणे