लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या तुलनेने २४१ रुपयांनी वाढले आहेत; परंतु त्या तुलनेत मोदी सरकारने जाहीर केलेली सबसिडी मात्र वर्षभरापासून शून्य करण्यात आली आहे. यामुळे आधी मिळणारी शेकडो रुपयांची सबसिडी गेली कुठे? असा सवाल आता सामान्य नागरिक मोदी सरकारला विचारू लागले आहेत.
महिना घरगुती सिलिंडरचे दर
जुलै २०२० ५९४.५०
ऑगस्ट ५९४.५०
सप्टेंबर ५९४.५०
ऑक्टोबर ५९४.५०
नोव्हेंबर ६९४.५०
डिसेंबर ५९४.५०
जानेवारी २०२१। ६९४.५
फेब्रुवारी ८१९.५०
मार्च ८०९.५०
एप्रिल ८०९.५०
मे ८०९.५०
जून ८०९.५०
जुलै २०२१ ८३५.००
(आकडे रुपयांत)
-----------
या सर्व महिन्यांत गॅसवर मिळणारी सबसिडी शून्य रुपये असल्याचे शहरातील गॅसवितरकांनी सांगितले.
/------------
प्रतिक्रिया
शहरात चूलही पेटविता येत नाही, एकीकडे गॅसचा खर्च वाढला असून, कोरोनाच्या साथीमुळे कुटुंबप्रमुखाचे वेतन कमी झाले आहे. काहींची नोकरी गेली. त्यात सबसिडी बंद केल्याने, अच्छे दिन गेले कुठे? केंद्र व राज्य शासन करतेय काय? सामान्यांना कोणी वाली आहे की नाही?
-त्रस्त गृहिणी
---------
गॅस महाग, वीज महाग, पेट्रोल डिझेलबाबत बोलायची सोय नाही. लॉकडाऊन काळात सामान्यांना दिलासा मिळायला हवा होता; पण तसे काही झाले नाही. सर्वत्र सरसकट महागाई वाढलेली आहे. त्यात घरगुती गॅस सिलिंडर हजार रुपयांपासून काहीसा दूर आहे. पगार तेवढेच, कपात सुरूच. नोकऱ्या टिकवण्यासाठी धडपड करायची आणि सरकारविरोधात बोलायचे नाही, अशी कोंडी झाली आहे. मग घर चालवायचे कसे?
-महागाईने हैराण झालेली गृहिणी