शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

दबावापुढे झुकू नका; आमदार गायकवाड यांच्या पाठीशी भाजपचे पदाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 11:06 AM

शिंदे गटाच्या दबावापुढे झुकू नका, कारवाई करू नका : पक्षातून मागणी

कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दबावाला बळी पडून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यावर विनाकारण कारवाई करू नका. शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडलो तर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण शिवसेनेकडून सुरू होईल, अशा भावना भाजपचे काही आमदार, पदाधिकारी व कल्याणमधील गायकवाड यांचे कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केल्या. यामुळे शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद असले तरी त्या पक्षाच्या दबावतंत्राला भाजप बळी पडणार नसल्याचे संकेत प्राप्त झाले.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्वेत बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक पार पडली. बैठकीत कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी आ. गायकवाड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी राज्यातील काही भाजप आमदारांशी संपर्क साधून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या दबावतंत्राला बळी पडू नका, अशी विनंती उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचे एका पदाधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

आ. गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले शेकडो कोटी रुपये पडून असल्याचा आरोप केल्याने शिंदे व त्यांचे समर्थक मंत्री व आमदार कमालीचे बिथरले आहेत. त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन आ. गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर लागलीच आ. गायकवाड यांच्या समर्थनार्थ भाजपा पदाधिकारी, कार्यकत्र्यांची बैठक पार पडली. तीत सगळ्यांनी आ. गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. या घटनेने कल्याण पूर्वेत भाजप कमकुवत होईल, अशी कुणाची भावना असेल तर तो गैरसमज आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 

कडेलोट झाल्याने गायकवाड यांनी उचलले पाऊल

■ भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यात शिवसेनेच्या गेल्या काही महिन्यांतील आक्रमकतेविरुद्ध खदखद आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या दबावाला न जुमानता आ. गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना भाजपमध्ये जोर धरत आहे.• आ. गायकवाड यांचा मार्ग चुकीचा असेल, पण शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने सतत त्यांचा अपमान करत होते, त्यांच्या कामाचे श्रेय लाटत होते ते पाहता त्यांच्या संयमाचा कडेलोट झाला व त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.• आ. गायकवाड यांच्या गोळीबारानंतरही जनमानसात त्यांची लोकप्रियता कायम असल्याकडे भाजपचे नेते लक्ष वेधत आहेत. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत शिदे गटाची झुंडशाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन वर्षात सहन केली असल्याचे सांगत भाजप गायकवाड प्रकरणानंतर एकवटली असल्याचे कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :MLAआमदारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेFiringगोळीबार