डोंबिवली: रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे काही सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. स्थानक परिसरातील पूर्वेकडील दिशेला ३.५ टन कचरा कमी झाला असून त्याबद्दल स्वच्छता अधिकारी, कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले आहे.फेरीवाल्यांमुळे स्थानक परिसरात ओला कच-याचे प्रमाण जास्त होते. त्यातही प्लास्टिकचा समावेशपण तुलनेने जास्त होता. पण महिनाभरापासून स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर सुरु असलेल्या कारवाईमुळे कच-याचे प्रमाणही घटले असल्याची माहिती स्वच्छता विभागाचे अधिकारी वसंत देगलुरकर यांनी दिली. ते म्हणाले की बाजीप्रभू चौक, राथ रोड, यासह केळकर रोड, नेहरु रोड आदी ठिकाणी मोठया प्रमाणावर कचरा व्हायचा. चिमणी गल्लीसह परिसरातील रस्त्यावर प्रचंड ओला कचरा असायचा. तेथे बसणारे भाजीवाले, फेरीवाले, फुल विक्रेते तो कचरा तेथेच टाकत असत, पण सातत्याने कमी अधिक प्रमाणात होत असलेल्या कारवाईमुळे ते प्रमाण घटले असून तब्बल ३.५ टन कचरा कमी झाला आहे.कचरा वेचक मोठी गाडी तीन-चार वेळा स्थानक परिसरात यायची, पण आता ती दोन वेळा येत असल्याने स्वच्छता कर्मचा-यांमध्येह समाधान आहे. ओला-सुका कचरा वेगवेगळा करण्यासंदर्भात सातत्याने सूचना देऊनही फेरीवाले त्याचे पालन करत नाहीत याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता कारवाई होत असल्याने कचरा फारसा होत नाही. पालिकेची कारवाई चुकवून काही फेरीवाले बसतात, पण ते देखिल सध्या तरी फारसा कचरा करत नसल्याने या परिसरात समस्या नाही. त्यामुळे स्वच्छता ठेवण्यासाठी सहाय्य होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
डोंबिवली स्थानक परिसरात ३.५ टन कचरा कमी झाला : फेरीवाल्यांचे प्रमाण घटल्याचा सकारात्मक परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 5:00 PM
रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे काही सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. स्थानक परिसरातील पूर्वेकडील दिशेला ३.५ टन कचरा कमी झाला असून त्याबद्दल स्वच्छता अधिकारी, कर्मचा-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठळक मुद्दे पूर्वेकडील ग-फ प्रभाग स्वच्छता अधिका-यांची माहितीबाजीप्रभू चौक, राथ रोड, यासह केळकर रोड, नेहरु रोड आदी ठिकाणी मोठया प्रमाणावर कचरा व्हायचा