शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

‘डॉ. कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज’मध्ये केडीएमसी शाळेतील १० विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:16 AM

मराठीतून प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेश झोन इंडिया आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेज २०२१ साठी कलाम फाउंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी महापालिका शाळेतील १० विद्यार्थ्यांना मार्टिन ग्रुपतर्फे दत्तक घेतले आहे. या विद्यार्थ्यांना उपक्रम बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी जे.जी. तडवी यांनी दिली.

दहा मुलांचा हा चमू पुण्यातील जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयात उपग्रह बनविण्याच्या उपक्रमात सहभागी होणार आहे. हा चमू १९ जानेवारी रोजी पुण्याला जाणार आहे. पालिकेच्या बारावे शाळेतील विद्यार्थी पंढरीनाथ शेळके, प्रथमेश घावट, बल्याणी शाळेतील बुशारा सऊदआलम, कशीश शेख, तिसगाव शाळेतील माणिक राठोड, सुजल गोठणकर, उंबर्डे शाळेतील गौतम इंगोले, अफरोज शेख, नेतीवली शाळेतील नवाज शेख, दीप कडव या दहा विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. १०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात नेण्याच्या प्रक्रियेत हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. अवकाश तंत्रज्ञानाविषयी या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे हा उद्देश आहे. मराठीतून प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक सज्ज आहेत. हेलियम बलून म्हणजे काय, पेलोड क्यूब्ज म्हणजे काय, उपग्रह अभ्यासासाठी कोणते सेन्सर वापरले जातात, याची माहिती विद्यार्थ्यांना मराठीतून दिली जाणार आहे.

प्रकल्पामुळे अवकाशातील शेती संशोधनास होणार मोलाची मदत

जगातील सगळ्यात कमी वजनाचे अर्थात २५ ते ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह तयार करून ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर ते बलूनद्वारे प्रस्थापित केले जातील. हे उपग्रह एका केसमध्ये फिट असतील. त्याला पॅराशूट, जीपीएस सिस्टीम, लाइव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून पृथ्वीवरील ओझोन, हवेची शुद्धता, प्रदूषण याची माहिती पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. पेलोडसोबत काही झाडांची बीजे पाठविली जातील. त्यामुळे कृषी क्षेत्राला अवकाशातील शेती संशोधनास मदत मिळू शकते.

जगातील सगळ्यात कमी वजनाचे अर्थात २५ ते ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह तयार करून ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर ते बलूनद्वारे प्रस्थापित केले जातील. हे उपग्रह एका केसमध्ये फिट असतील. त्याला पॅराशूट, जीपीएस सिस्टीम, लाइव्ह कॅमेरा जोडलेला असेल. तेथून पृथ्वीवरील ओझोन, हवेची शुद्धता, प्रदूषण याची माहिती पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. पेलोडसोबत काही झाडांची बीजे पाठविली जातील. त्यामुळे कृषी क्षेत्राला अवकाशातील शेती संशोधनास मदत मिळू शकते.

 

टॅग्स :thaneठाणेStudentविद्यार्थी