ठाणे, दि. 28 - वर्तकनगर येथील महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाची दुरवस्था झाली असून रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. सोमवारी सकाळी महापौरांनी स्थानिक नगरसेवक आणि पालिकेच्या अधिकाºयांसह या रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.डॉ.आनंदीबाई जोशी रु ग्णालयात २६ आॅगस्ट २०१७ रोजी शॉर्टसर्किट झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही हानी झाली नाही. याच पार्श्वभूमीवर महापौरांनी सोमवारी ही पाहणी केली. उपमहापौर रमाकांत मढवी, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले, सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडीत आणि कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड आदी यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते.या रुग्णालयाची इमारत २८ वर्षे जुनी असून तिच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव २०१७- २०१८ च्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही केल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली. वर्तकनगर, लोकमान्यनगर, भीमनगर, शास्त्रीनगर, येऊर, उपवन, पाटोणपाडा, कोकणीपाडा, शास्त्रीनगर, येऊर, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, पवारनगर आणि वागळे इस्टेट आदी चार ते पाच लाख लोकवस्तीच्या परिसरातील रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव खाटांचे अद्ययावत रु ग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश यापूर्वी प्रशासनास दिले आहेत.या रु ग्णालयाच्या वास्तूची संबंधित अधिकाºयांसमवेत पाहणी केल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉक्टरांशी केलेल्या चर्चेनंतर वर्तनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ४४ च्या इमारतीमध्ये बाहयरुग्ण तपासणी आणि लोकमान्यनगर येथील पालिकेच्या रुग्णालयात प्रसुतीची व्यवस्था करुन संपूर्ण रुग्णालय स्थलांतरीत करण्याचे आदेश महापौरांनी संबंधितांना दिले.या रुग्णालयात येणारे रुग्ण हे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आहेत. त्यामुळे गरिब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या या रुग्णालयाचा पुनर्विकास तातडीने करुन तिथे आवश्यक आणि अद्ययावत सेवा - सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. यासाठी आपण व्यक्तीश: लक्ष घालणार असल्याने आगामी दोन ते तीन वर्षातच हे अद्ययावत रुग्णालय वर्तकनगर परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
डॉ. आनंदीबाई जोशी रु ग्णालयाचा पुनर्विकास करण्याचे महापौरांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:19 PM