लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दीड कोटींच्या व्हेंटीलेटर खरेदीचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये पाच लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडलेल्या ठाणे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरु डकर याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. डॉ. मुरुडकरच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर ठाणे न्यायालयाने हे आदेश दिले.डॉ. मुरु डकर याने ठाणे महापालिकेत ३० व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी निविदा मंजूर करून देतो, असे सांगून निविदेच्या एकूण रकमेच्या दहा टक्क्यांप्रमाणे १५ लाखांच्या रकमेची मागणी संबंधित व्हेंटिलेटर पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे केली होती. त्यातील पाच लाखांचा हाप्ता घेताना ८ एप्रिल रोजी नवी मुंबईतील ऐरोली येथील एका खासगी रु ग्णालयात त्याला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तेंव्हा पोलीस कोठडीऐवजी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. दरम्यान, याच प्रकरणात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. देवगीकर आणि कार्यकारी वैद्यकीय अधिकारी मंदार महाजन यांच्याकडेही ठाण्याच्या एसीबीने चौकशी केली. व्हेंटीलेटर्स खरेदीची निविदा प्रक्रीया कशा प्रकारे चालते? ती नेमकी कशी मंजूर होते? यामध्ये प्रशासकीय काय अटी शर्ती असतात? त्या कशाप्रकारे तपासल्या जातात? याची माहिती या अधिकाऱ्यांकडून घेण्यासाठी ही चौकशी करण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाºयांनी दिली.
डॉ. राजू मुरुडकर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:13 AM
दीड कोटींच्या व्हेंटीलेटर खरेदीचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये पाच लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडलेल्या ठाणे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरु डकर याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचे आदेश