शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. प्रतीक तांबेच्या ‘निर्मिती’ क्लिनिकला पोलिसांनी ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 2:45 AM

सरोगसीच्या तपासणीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. प्रतीक तांबेच्या निर्मिती क्लिनिकला पोलिसांनी सोमवारी सील ठोकले. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तद्विषयक अहवालातून तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : सरोगसीच्या तपासणीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करणा-या डॉ. प्रतीक तांबेच्या निर्मिती क्लिनिकला पोलिसांनी सोमवारी सील ठोकले. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तद्विषयक अहवालातून तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईतील धारावी येथील २१ वर्षीय पीडित महिलेने तिचे गर्भाशय भाड्याने (सरोगसी) दिले होते. संबंधित व्यक्तीशी करार झाल्यानंतर ही महिला १७ आॅगस्ट रोजी नौपाडा येथील निर्मिती क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आली होती. त्या वेळी तांबे याने तपासणीच्या नावाखाली बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. नौपाडा पोलिसांनी डॉक्टरला अटक केली असून तो २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी क्लिनिकला सील ठोकल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सोमवारी दिली.