शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
3
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
4
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
5
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
6
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
7
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
8
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
9
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
10
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
11
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
12
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
13
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
14
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
15
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
16
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
17
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
18
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

अवधूत यरगोळे यांना डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार

By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 09, 2023 4:53 PM

अजेय संस्थेच्यावतीने गेली ११ वर्षे झपुर्झा हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो.

ठाणे : अजेय संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या झपुर्झा २०२३ या पुरस्कार सोहळ्यात डॉ. श्रीराम लागू तालीम सर्जक पुरस्कार अवधूत यरगोळे तर गुरुवर्य केशवराव मोरे सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार हर्ष नायर यांना प्रदान करण्यात आला. शनिवारी हा पुरस्कार प्रदान सोहळा डॉ. बेडेकर विद्या मंदिर येथील विद्यालंकार सभागृहात पार पडला.

अजेय संस्थेच्यावतीने गेली ११ वर्षे झपुर्झा हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्यांतर्गत रंगजेता ही स्पर्धा आयोजित घेण्यात आली होती. या स्पर्धेची प्राथमिक फेरी डोंबिवली येथे जून महिन्यात तर ५ जुलै रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी गडकरी रंगायतन नाट्यगृहात पार पडली. यात ३० स्पर्धक सहभागी झाले होते. नाट्याविष्कार आणि नृत्य सादरीकरणाद्वारे विविध ज्वलंत विषय त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून हाताळले. या स्पर्धेचे परिक्षण अजेय संस्थेचे डॉ. क्षितीज कुलकर्णी यांनी केले. या अंतिम फेरीतून सहा जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

झपुर्झा पुरस्कार हे संपूर्ण प्रक्रियेतील कलाकारांचे गुण, त्यांचे विचार, वागणे, अभिनयातील मेहनत, प्रतिभा, आशा अनेक पैलूंचा विचार व निरीक्षण करून दिले जातात. केलेल्या काम बघून हे पुरस्कार दिले जातात अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. शनिवारी ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर, लोकमतच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा म्हात्रे, ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एखादी कला सादर करण्यासाठी पुस्तकाचे वाचन अत्यंत आवश्यक आहे असे बोधनकर यांनी सांगितले. अजेय संस्था ही उत्तम काम करत असल्याचे कौतुकोद्गार जाधव यांनी काढले.

झपुर्झा पुरस्कार २०२३ खालीलप्रमाणे

१. नृत्यनयूर पुरस्कार : रोहन शिर्के आणि साक्षी जोगळे.२. रंगसाधक पुरस्कार : कार्तिक हजारे, प्रसन्न माळी.

३. चेहरा पुरस्कार : श्रुतिका येसादे, हर्ष नायर.४. पु. ल. देशपांडे स्मृती विनोदी अभिनय : समीर शिर्के, हेमांगी संभूस.

५. उत्स्फूर्तता सर्जक पुरस्कार : गौरव संभूस६. . झपूर्झा मैत्र पुरस्कार : रोहन शिर्के.

विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र

१. हर्ष नायर.२. अमोघ देवस्थळी.

३. कार्तिक हजारे.४. प्रसन्न माळी.

५. श्रुतिका येसादे.६. रोहन शिर्के.

७. हेमांगी कुळकर्णी संभूस.८. प्रसन्न माळी.

टॅग्स :thaneठाणे