शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

ठाण्यात डॉ. कलाम कल्पकता केंद्र

By admin | Published: January 05, 2017 5:41 AM

लोकमतने आपल्या काही तरी कर ठाणेकर मोहिमेतंर्गत शहरातील तलावांच्या दुरस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने ती दूर करण्याची पाऊले उचचली

ठाणे : लोकमतने आपल्या काही तरी कर ठाणेकर मोहिमेतंर्गत शहरातील तलावांच्या दुरस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने ती दूर करण्याची पाऊले उचचली.त्यानुसार विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासबरोबरच विज्ञानाचीदेखील आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आता ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव परिसरातील डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्राचा शुभारंभ गुरुवारी होत आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना रोबोटीक विज्ञानाची माहिती आणि मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.कचराळी तलाव परिसरातील एका खोलीमध्ये कल्पकता केंद्र उभारणीचे काम पूर्ण झाले असून गुरुवारी सांयकाळी ५.३० वाजता महापौर संजय मोरे यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण केले जाणार आहे. कचराळी तलावाच्या काठापासून जवळच ही खोली असून त्याठिकाणी विज्ञानाच्या प्रयोगांसाठी विशिष्ट आसनव्यवस्था आहे. त्यामुळे तलावाच्या काठावर आता विद्याार्थी विज्ञानाचे धडे गिरवणार आहेत. विज्ञानाची आवड असलेल्या विद्याार्थ्यांना विविध प्रकारचे प्रयोग करण्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून कल्पकता केंद्रांची उभारणी केली गेल्याचे सांगण्यात येत आहे. लोकमतने काही तरी कर ठाणेकर या अंतर्गत या तलावाच्या दुरवस्थेबाबत आवाज उठविताच पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सकाळीच घटनास्थळी भेट देऊन येथे सुशोभीकरणासह अन्य पर्याय सुचविले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून प्रभाग सुधारणा निधींतर्गत कल्पकता केंद्र उभारणीचे केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्याार्थ्यांना विनामुल्य प्रशिक्षण दिले जाणार असून त्याठिकाणी त्यांना विविध प्रकारचे प्रयोग करणे शक्य होणार आहे. या केंद्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी आतापर्यंत १०० विद्याार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शालेय विद्याार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावे आणि विविध प्रयोग व प्रात्यिक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, यासाठी डॉ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्र उभारले आहे. या केंद्रामध्ये पहिली ते दहावीच्या विद्याार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १५ विद्याार्थ्यांची एक बॅच असणार असून दिवसातून चार बॅच घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे विज्ञानाच्या प्रयोगासाठी महापालिकेकडून साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या केंद्रामध्ये विज्ञान क्षेत्रात भरीव कामिगरी करणाया शास्त्रज्ञांचे छायाचित्र लावण्यात आले आहेत. या केंद्रामध्ये विद्याार्थ्यांना आठवड्यातून दोन तास विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स अशा विविध विषयांवरील ३ हजारहून अधिक प्रयोग स्वत:च्या हाताने करण्याची संधी उपलब्ध होणार झाली आहे. (प्रतिनिधी)