डोंबिवली: वेदमूर्ती डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी ज्यांनी चारही वेदांचा मराठीत अनुवाद केला. ७० उपनिषदे यांचेही त्यांनी भाषांतर केले. संस्कृतीचे मोठे देणे समाजपुरुषाला दिले. ते साक्षात वेद स्वरूप, ज्ञानस्वरूप होते. त्यांचे वयाच्या ९९व्या वर्षी, वार्ध्यक्याने सोमवारी निधन झाले. याच वर्षी त्याना त्यांच्या वेदांच्या अभ्यासाबद्दल डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली होती.
संपूर्ण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. वेद स्वरूप होऊन ते काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात शुक्ल यजुर्वेदीय माध्य. ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदीप जोशी गुरुजींसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.