ठाणे : मुंबईच्या नायर रूग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी श्रमजीवीेच्या महिला ठिणगी कार्यकत्या युवतींनी मंगळवारी ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयावर पोस्टर, बॅनर घेऊन धडक मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर कडक करवाई करून त्यांना वेळीच निलंबीत करावे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्य निवेदनात केलीजिल्ह्यातील आदिवासी, दलित युवती येथील जांभळी नाका येथे एक येऊन त्यांनी दुपारी हा धडक मोर्चा काढला. या युवती टेंभी नाका, सिव्हील रूग्णालय, सेंट्रल मैदान या मार्गाने येथील शासकीय विश्रामगृहाजवळ हा मोर्चा आडवण्यात आला. या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन महिला ठिणगीच्या या युवतींना शासनास सज्जड दम देत सुरक्षेची जोरदार मागणी केली. डॉ. तडवी यांची आत्महत्या नसून जातीयतेचा हा बळी आहे. त्या आदिवासी असल्याचे माहीत असूनही त्यांना जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी पानउतार करणे, अपमानीत करणे आदी कृत्य करण्यात आल्याचे या युवतींनी यावेळी स्पष्ट केले.या जातीयतेच्या छळवणुकीतूनच डॉ. तडवी यांना आत्महत्या करावी लागली आहे. यास कारणीभूत असलेल्या जातीयवादी आरापींचा यावेळी निषेध करून त्यांच्यावर गुन्हे दालख करण्याची मागणी युवतीं केली. याशिवाय आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. महिरे, डॉ. खंडेलवाल यांच्यावर अॅट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करा, त्यांना तत्काळ अटक करा, त्यांची डॉक्टर पदवी काढून घ्या, आदिवासी, दलित युवतींची छळवणूक होऊ नये म्हणून शासनाने तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करा आदी मागण्यांचे निवेदन यावेळी या युवतींनी दिले. यामध्ये नंदा वाघे, जया पारधी, सुमन हिलम, संगिता भोमटे, सविता पाटील, कमल गुलूम, हिराबाई खांजोडे, प्रमिला जाधव, गिता फसाले, संगिता वाघे, भिमा निरगुडा, अनिता वाघे, नैना म्हस्कर दिपाली भोईर, निकिता रायात वैशाली पाटील आदी युवतींनी या धडक मार्चात सहभाग घेऊन तीव्र निषेद नोंदवला, असे श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितले.