ठाणे: विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. हा सांगता समारंभ शनिवारी डॉ. बेडेकर विद्या मंदिर शाळेच्या पटांगणात पार पडला. यावेळी मंडळाच्या शैक्षणिक संस्थेतील आजी - माजी मुख्याध्यापक आणि प्राचार्य तसेच, डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या संदभार्तील आठवणी जागविणारे मनोगत व्यक्त केले. मंडळाचे कार्याध्यक्ष आणि विश्वस्त डॉ. विजय बेडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या कार्याचा आढावा घेणारी, त्यांची जुन्या काळातील छायाचित्रे दाखविण्यात आली. बांदोडकर महाविद्यालयाचे प्राचार्य सी. जी. पाटील म्हणाले की, डॉक्टर हे खुप प्रेमळ होते. रुग्णांना ते प्रेमाने तपासायचे, आमच्या कुटुंबाचे आरोग्य राखण्यात त्यांचा मोठा वाटा आहे असे ते म्हणाले. संघर्ष करुन शिकणाºया गरिब मुलांची डॉक्टरांना काळजी असे. त्यांचे शिक्षणावर खुप प्रेम होते. मला त्यांनी मुलाखतीत मुलांना जीवनाची फिलॉसॉफी हा प्रश्न विचारला आणि या संस्थेतच शिकवायचे असे त्यावेळी ठरविले अशी आठवण जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी सांगितली. त्यानंतर पॉलिटेक्निकचे प्राचार्य दिलीप नायक, मंडळाचे विश्वस्त शरद वेंगुर्लेकर, प्रा. श्रीविद्या जयकुमार, शाळेचे माजी मुख्याध्यापक सहस्त्रबुद्धे, प्राचार्य बी.एन. लाड, डॉ. एच. एस. भानुशाली यांनी त्यांच्या आठवणी, किस्से सांगितले. डॉ. महेश बेडेकर म्हणाले की, आजोबांचा मला ३५ वर्षांचा सहवास लाभला. त्यावेळी त्यांनी केलेल्या संस्कारांचे आज महत्त्व कळत आहे. यावेळी सुमेधा बेडेकर यांनी ‘क्षण आला भाग्याचा’, ‘प्रितीचा कल्पतरु जो मला लाभला’ ही गीते सादर केली. शाळेचे माजी विद्यार्थी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. सुरूवातीला ईशस्तवन अनिरुद्ध जोशी सादर यांनी सादर केले. याच समारंभात डॉ. वा. ना. बेडेकर यांची व्यक्तिवैशिष्ट्ये चित्रित करणारी स्मरणिका, त्यांच्या संदभार्तील कॉफी टेबल बुक, त्यांचे छायाचित्र असलेले स्टॅम्प आदींचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, मंडळाच्या सदस्या अल्पना बापट, शाळेचे मुख्याध्यापक व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या आठवणींना दिला उजाळा, जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 5:03 PM
डॉ. वा. ना. बेडेकर यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ शनिवारी शाळेच्या पटांगणात संपन्न झाला.
ठळक मुद्देडॉ. वा. ना. बेडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ त्यांच्या संदभार्तील आठवणी जागविणारे मनोगत व्यक्त स्मरणिका, त्यांच्या संदभार्तील कॉफी टेबल बुक, त्यांचे छायाचित्र असलेले स्टॅम्प आदींचे प्रकाशन