ठाणे : ज्येष्ठ संशोधक व पुरातत्त्व इतिहासाचे तज्ज्ञ डॉ. यशवंत रायकर यांचे वृद्धापकाळाने वेदान्त हॉस्पिटल येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. केंद्राच्या पुरातत्त्व खात्यात संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. रायकर यांनी अरुणाचल प्रदेश व अंंदमान येथे उत्खनन विभागात विपुल संशोधन केले. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना आसामच्या राज्यपालांनी सुवर्णपदक देऊन गौरविले होते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील नेहरू सेंटरमध्ये संशोधक म्हणून काम पाहिले होते. भारत एक शोध, या प्रकल्पाच्या स्थायी प्रदर्शनाच्या त्यांनी केलेल्या आराखड्याचेही कौतुक झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगी सुमेधा रायकर-म्हात्रे, मुलगा सुधीर, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
डॉ. यशवंत रायकर कालवश
By admin | Published: November 17, 2015 1:45 AM