लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद गोखले (वय ४७) यांचे सोमवारी रात्री ९ च्या सुमारास येथील संजीवनी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते महिनाभरापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पश्चिमेतील विजय नगरातील त्रिशुल चाळीत ते राहत होते. ‘कलासंस्कार’ या संस्थेतर्फे बालनाट्य शिबिर सुरू करण्याची संकल्पना त्यांना सुचली. ती त्यांनी अमंलातही आणली. तसेच ‘कलासागर,’ ‘आम्ही सारे’ अशा नाट्यसंस्थांचे ते संस्थापक होते. संस्थेतर्फे ते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना घेऊन जात असत. ‘अवघची संसार,’ ‘वादळवाट,’ ‘कन्यादान’ अशा अनेक मालिकांचे संकलक म्हणून त्यांनी काम पाहिले. ‘कोण म्हणाले, ‘सुरुवात’ आदी एकांकिकाचे लेखन त्यांनी केले आहे. ‘असं सासर सुरेखबाई’ मालिकेचे दिग्दर्शन तर ‘दर्शन’ तसेच अनेक मालिकांचे त्यांनी एडिटिंग केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आरती, मुलगी इशिता असा परिवार आहे. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास शिवमंदिर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार झाले.
नाट्यकर्मी प्रसाद गोखले यांचे निधन
By admin | Published: July 05, 2017 6:06 AM