शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नेते काढताहेत एकमेकांची औकात, कलगी-तुऱ्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:04 PM

निवडणूक लोकसभेची पण जुंपली विधानसभेची

मीरा रोड : मीरा-भाईंदर मतदारसंघाचे भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यात निवडणूक प्रचारानिमित्त चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर जहरी टीका करत औकात काढण्यासह आव्हानांची भाषा वापरली जात आहे. निवडणूक लोकसभेची असली, तरी प्रचाराचा धुराळा मात्र विधानसभा निवडणुकीचा उडू लागला आहे.मुझफ्फर यांनीच शहरातील राष्ट्रवादी आणि नाईक कुटुंबीयांची ताकद संपवल्याचे सांगत, असा मित्र असेल तर दुश्मनाची गरज नाही, असे म्हटले होते. विधानसभेचे इच्छुक उमेदवार मुझफ्फर यांनीसुद्धा शहराचा चौकीदार चोर नव्हे तर डाकू असल्याची झोड उठवली होती. एका सभेत मुझफ्फर यांनी पंतप्रधान मोदींना लोकांना फसवणारे जुमलेबाज तसेच चोर, चिटर, लबाड आदी उपमा दिल्या होत्या. दिल्लीतले नालायक आणि नालायकाचं पोर पण नालायक अशा शेलक्या शब्दांत त्यांनी आ. मेहतांवरही टीका केली होती. मेहतांची औकात १५ लाखांवरून ५०० कोटी कशी झाली? इमानदारीने पैसे कमवून झाले का? कचºयाचे ४० कोटींचे टेंडर यांनीच घेतले. पालिकेत पैसे नाहीत म्हणून लोकांवर घनकचरा शुल्क लादले. बिल्डरांसाठी रस्ते, गटार, पाणी सर्व सहज देतात. काँग्रेसचे नगरसेवक फोडायला एक कोटीची ऑफर देतात. हे स्वत:च्या खिशातून पैसे देणार आहेत का, अशा प्रश्नांचा भडिमार मुझफ्फर यांनी केला होता. भाजपचे निम्मे नगरसेवक हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत, असे ते म्हणाले होते. मुझफ्फर यांच्या टीकेला आ. मेहतांनीसुद्धा जळजळीत उत्तर दिले आहे. आपली औकात काढणाऱ्या मुझफ्फर यांना जनतेने गेल्या काही निवडणुकांमध्येच औकात दाखवली आहे. मोदींवर बोलण्याची त्यांची औकात आहे का? तोंड उघडायला लावू नका, असा इशाराही आ. मेहतांनी दिला. येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच पुन्हा त्यांना औकात दाखवेल, असा इशारा दिल्याने ते बिथरले आहेत. म्हणूनच, लोकसभेची निवडणूक असताना विचारेंवर बोलण्याऐवजी माझ्यावर बोलत आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांना एक कोटी सोडा, चारआणेसुद्धा मी देणार नाही, अशी टीका मेहता यांनी केली.जकात मुझफ्फर यांनीच लादली. कचºयाचा ठेका आजही त्यांच्याच काळातला सुरू आहे. अजून कायकाय केले आहे, त्याची जंत्रीच माझ्याकडे आहे. मी नगरसेवक नव्हतो, तेव्हा पण माझ्याकडे मर्सिडीज गाडी, ब्ल्यूमून क्लब, बॉम्बे मोटर्स आदी होते. क्लबच्या उद्घाटनास मुझफ्फरही होते. पण, तुमच्याकडे अस्मिता क्लब, मार्केट आदी कसे आले? मला तुमची औकात काढायला लावू नका, असा इशारा आ. मेहतांनी दिला.ब्ल्यू फिल्म विकणारा व रिक्षा चालवणाराआमदार प्रताप सरनाईक आणि आ. मेहतांची एकमेकांवर ब्ल्यू फिल्म विकणारा व रिक्षा चालवणारा यापासून झालेली आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक शहराने नुकतीच पाहिली होती. आता विधानसभा निवडणुकीआधीच आ. मेहता आणि मुझफ्फर यांच्यात एकमेकांची औकात काढण्यापासून चिखलफेक सुरू झाली आहे. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आ. मेहतांनी मुझफ्फर हुसेन यांना टोले लगावले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019