शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

गटाराच्या सांडपाण्यात बसून विद्यार्थी घेतात शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:24 AM

पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातील चार उर्दू माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये पावसाचे व गटाराचे सांडपाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे जिकिरीचे होत आहे.

कल्याण : पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातील चार उर्दू माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये पावसाचे व गटाराचे सांडपाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे जिकिरीचे होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या शाहीन जव्वाद डोण यांनी केडीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. विरोधी पक्षाला सत्ताधाºयांकडून पक्षपाती वागणूक मिळत आहे. प्रशासनाने राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.रेतीबंदर परिसरातील मोहम्मदीया, नॅशनल, अल्फा आणि आसरा या चार खाजगी उर्दू शाळा आहेत. मोहम्मदीया शाळेत ७०० विद्यार्थी, उर्दू नॅशनल स्कूलमध्ये २ हजार आाणि आसरा शाळेत ६००, तर अल्फा शाळेतून ३०० विद्यार्थी आहेत. या शाळांमध्ये पावसाचे पाणी साचते. शाळांच्या परिसरातून वाहणारी गटारे तुटुंब भरतात. त्यातील पाण्याचा न होणारा निचरा तसेच तेथील गटार फुटल्याने सांडपाणी थेट शाळेतील वर्गात शिरते.परिणामी, विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काही शाळांमध्ये बसायला बाक आहेत. मात्र, साचलेल्या पाण्यात पाय भिजल्याने पायाला चिखल्या होऊन खाज सुटत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.या प्रभागातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शाहीन डोण या महापालिकेत गटनेत्या आहेत. शाळेत पावसाचे पाणी साचल्यावर ते काढण्यासाठी सफाई कर्मचाºयांना बोलवल्यास ते येत नाहीत. काही सफाई कर्मचारी त्यांच्या बदल्यात सफाई कर्मचारी नेमत असल्याने सफाई कामगारांकडून हप्तेबाजी केली जाते.त्यात प्रशासनही लिप्त आहे. एक गोल्डन कर्मचारी बिल्डर असल्याची बाब नुकतीच महासभेत उपस्थित झाली होती. त्याला दुजोरा देणारा शाहीन यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे सफाई कामगारांनी त्यांच्या तक्रारीकडे पाठ दाखवली आहे.