अंबरनाथ : अंबरनाथ येथील प्रशाकीय इमारतीमधील पंचायत समितीच्या कार्यालयाला गळती लागली आहे. संपूर्ण चौथा मजला गळत असल्याने अधिकाऱ्यांना या ठिकाणी काम करणे अवघड जात आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करुनही अधिकारी या इमारतीची गळती रोखण्यसाठी उपाययोजना करत नसल्याचे समोर आले आहे.अंबरनाथ तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय हे एकाच प्रशासकीय इमारतीत असून पहिले दोन मजले हे तहसीलदार कार्यालयासाठी असून उर्वरित दोन मजल्यांवर पंचायत समिती कार्यालय आहे. या इमारतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मुसळधार पावसात पंचायत समितीचे चौथा मजला हा पूर्णपणे गळत असून मोठ्या प्रमाणात पाणी कार्यालयात आले आहे.समितीचे एकही कार्यालय या गळतीतून वाचलेले नाही. गेल्या आठवड्याभरापासून अधिकारी आणि कर्मचारी काम करण्यासाठी सुरक्षित जागा शोधत आहेत. कार्यालयातील टेबलवरही पाणी पडत असल्याने त्या ठिकाणी बसून कामही करणे शक्य होत नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सदस्या दया शेलार यांनीही जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केली आहे. इमारतीला लागलेली गळती सोबत या ठिकाणी स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था, स्वच्छ पाण्याचा अभाव आदी तक्रारी यावेळी करण्यात आल्या. या गळतीमुळे कामासाठी येणाºया नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.पत्रे टाकून गळती रोखणे शक्यया प्रशासकीय इमारतीच्या छतावर पत्रे टाकून त्या ठिकाणी गळती रोखणे शक्य आहे. मात्र त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग योग्य सहकार्य करत नसल्याचे अधिकारी सांगतात.तर दुसरीकडे या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग योग्य सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे या इमातीलाच धोका निर्माण होण्याची शक्याता आहे. चौथ्या मजल्याचे स्लॅब गळत असल्याने त्याचा थेट परिणाम हा इमारतीवर होणार आहे. याची कल्पना असतानाही दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
अंबरनाथ पंचायत समिती इमारतीमध्ये ‘ठिबक सिंचन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:56 AM