शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

मद्य प्राशन केल्याच्या संशयातून ठाण्यात टीएमटी बसच्या चालकाला रिक्षाचालकांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 9:28 PM

किरकोळ अपघातानंतर मद्य प्राशन केल्याच्या संशयातून टीएमटीच्या चालकाला काही रिक्षा चालकांनी माजीवडा नाका येथे बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या घटनेने टीएमटी चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपोलिसांच्या तपासणीत मात्र ‘निगेटीव्ह’ रिपोर्टमारहाण करणारे झाले पसार

ठाणे : मुलुंड ते भिवंडी या मार्गावरील शंकर गाडे (३५) या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) चालकाला काही रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास माजीवडा नाका येथे घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या चालकाने मद्य प्राशन करून बस चलविल्याचा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला होता. त्याच्या बसने एका उभ्या असलेल्या कारला गोल्डन डाइज नाका येथे धडक दिली. तेव्हा काही रिक्षाचालकांच्या आग्रहाने कारचे काय नुकसान झाले, हे पाहण्यासाठी गाडे खाली उतरले. तेव्हा त्यांना वाहतूक पोलिस चौकीत येण्यास एका टोळक्याने भाग पाडले. चौकीत नेत असतानाच रिक्षाचालकांच्या एका टोळक्याने त्यांना जबर मारहाण केली. कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीमध्ये श्वास विश्लेषक यंत्राद्वारे त्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांनी मद्य प्राशन केले नसल्याचे आढळले. या तपासणीत सत्य बाहेर आल्यानंतर त्याला मारहाण करणाºयांनी मात्र तिथून पळ काढला.......................काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांकडून तरुणीचा चालत्या रिक्षातच विनयभंग केल्याच्या दोन घटना कापूरबावडी परिसरातच घडल्या होत्या. प्रवासी नाकारणे, जादा भाडे घेणे हे तर नित्याचेच आहे. त्यातच टीएमटीचालकालाही त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेने टीएमटी चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.......................प्रवाशी घेण्याच्या आकसातून मारहाणभिवंडीकडे जाणा-या रस्त्यावर माजीवडा नाका (गोल्डन डाईज नाका) येथे टीएमटीच्या थांब्यावरूनच काही रिक्षाचालक प्रवासी घेतात. त्यांना टीएमटी बसचा अडथळा वाटतो. याच आकसातून त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे शंकर गाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.‘क्षुल्लक कारणावरून टीएमटी बसचालकाला मारहाण करणे चुकीचे आहे. त्यातच या चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे पोलिसांच्याच तपासणीत आढळले. त्यामुळे त्याला मारहाण करणा-यांवर कारवाई झाली पाहिजे.’-अनिल भोर, सभापती, ठाणे परिवहन सेवा,ठाणे

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा