शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

दुष्काळाचा फटका : शेतकऱ्यांचे लोंढे निघाले शहराकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 5:25 AM

नाका कामगार म्हणून उपजीविका : दुष्काळाचा फटका

योगेश पिंगळेनवी मुंबई : विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गावांमध्ये रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांनी मुंबई, नवी मुंबईकडे धाव घेतली आहे. जिथे जागा मिळेल तेथे राहून नाका कामगार म्हणून हे मजूर उपजीविका भागवू लागले आहेत.नेरु ळ, सानपाडा, कोपरखैराणे, तुर्भे आदी भागात वाशिम, नांदेड, यवतमाळ, पुणे जिल्ह्यातील लहान-मोठ्या खेड्यामधील शेकडो शेतकरी मजूर आपल्या कुटुंबासोबत गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य करीत आहेत.

मजुरीची कामे मिळावीत यासाठी नेरु ळ जनता मार्केट, तुर्भे नाका येथे सकाळीच कामाच्या शोधात जात आहेत. दिवसभराच्या कामाचा मोबदला पुरु षांना ४00 तर स्त्रियांना ३00 रु पये मिळतो; परंतु रोज काम मिळेल याची मात्र शाश्वती नाही. स्त्री मजूर वर्गाला वाशी येथील एपीएमसीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये कांदा निवडीचे काम मिळत आहे. त्यामुळे महिला कामगारांना देखील रोजगार प्राप्त झाला आहे. यामधील बºयाच शेतकरी मजुरांनी आपली शाळेत जाणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत व त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी घरी असलेले वृद्ध आई-वडील किंवा नातेवाईक यांच्याकडे ठेवले आहे.विदर्भ व मराठवाडा परिसरातील शेतमजूर प्रत्येक वर्षी दिवाळीनंतर मुंबईकडे येत असतात; परंतु यावर्षी अनेक भागात मजुरी मिळत नसल्यामुळे मुंबईत आले आहेत. कर्ज फेडण्यासाठी तर काही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी शहराकडे येत आहेत.शहरातही अडचणींचा डोंगरच्मुंबई, नवी मुंबईत आलेले शेतमजूर महापालिकांच्या अतिक्र मण विभागाकडून कारवाई होऊ नये यासाठी झोपड्या न बांधता उड्डाणपुलाखाली, पदपथ, मोकळे भूखंड अशा मिळेल त्या जागेवर उघड्यावरच राहत आहेत.च्काही ठिकाणी हे नागरिक मोकळ्या भूखंडावर झोपड्या बांधून राहत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून उघड्यावर वास्तव्य करणारे नागरिक असल्याचे समजल्यास लहान मुले व गरोदर माता यांना लसीकरण करत आहेत.पाऊस कमी झाल्याने खेड्याकडे मजुरीची कामे मिळत नाही. पोट भरण्यासाठी आम्ही शहरात आलो आहोत. लहान मुले शाळेत शिकत असल्याने मुलांना घरातील वृद्ध व्यक्तींकडे ठेवले आहे. शाळेत न जाणारी मुले सोबत आणली आहेत. - किसन गोरे, वाशिम

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड