जव्हार : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या जव्हार ते डहाणू रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यावर आता मोठ मोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत आहेत, तसेच खड्ड्यात आदळून वाहनांचेही नुकसान होत आहे. येथून मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे दररोज अनेक वाहने खड्डयात आदळून बंद पडतात. पक्क्या बांधकामामुळे गतवर्षापर्यंत या रस्त्याचा वाहन चालकांना कधी त्रास झाला नाही. पण आतामुळे त्याची दुरावस्था झाल्याने होतो आहे. त्यामुळे जव्हार-विक्रमगड-मनोर या रस्त्याची दूरावस्था झाल्यावर या रस्त्याने ठाण्याला जाणे लांब पडत असूनही चालक याच रस्त्याला प्राधान्य देत होते. मात्र कित्येक वर्षापासुन दुरूस्ती न झाल्याने या रस्त्याचीही दुरवस्था झाली. आता या रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की, रात्री खड्ड्याची खोलीच समजतच नाही. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
जव्हार-डहाणू रस्त्याची दुरावस्था
By admin | Published: September 01, 2015 11:57 PM