ठाणे - तिकीटाचे पैसे जास्त घेतल्याच्या कारणावरुन रमेश पेटकुलकर (वय 48 वर्ष) या प्रवाशाने एसटी वाहक कल्पेश चोरगे (वय 35 वर्ष) यांच्या हाताचा चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (15 ऑक्टोबर) रात्री वाघबील नाक्यावर घडली आहे. दरम्यान, प्रवासी रमेश पेटकुलकर हा दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत तो ठाणे स्टेशन ते वाघबील नाका,असा प्रवास करत होता. यादरम्यान, कंडक्टरनं तिकीटाचे पैसे जास्त घेतले असं सांगत रमेशनं तीन हातनाका येथून त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वादानंतर रमेशने कंडक्टर कल्पेश यांच्या उजव्या हाताला चावा घेतला. तशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सोमवारी पहाटे कासारवडवली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मद्यधुंद प्रवाशानं घेतला एसटी कंडक्टरच्या हाताचा चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 1:13 PM