शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

मद्यधुंद तरुणींचा भार्इंदरमध्ये धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 4:39 AM

पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की : वर्दीवर घातला हात : तिघींना अटक

मीरारोड : एका पार्टीतून परतलेल्या २२ ते २५ वर्षे वयोगटातील चार तरूणींनी सोमवारी मध्यरात्री भार्इंदरच्या मॅक्सस मॉलसमोरील महापालिका मैदानात चांगलाच धुडगूस घातला. पोलिसांना शिविगाळ आणि धक्काबुक्की करून वर्दीवर हात घालणाऱ्या या तरूणींना पोलिसांनी यथेच्छ प्रसाद दिला. तरूणींवर नशेचा अंमल एवढा होता की, त्यांनी पोलीस ठाण्यातही धिंगाणा घातला. एक तरूणी पळून गेली असून, पोलिसांनी याप्रकरणी तीन तरूणींना अटक केली आहे.

मीरा रोड येथील ममता नलतम्बी मेयर, अलिशा अमेश पिल्ले, कमल विद्यासागर श्रीवास्तव आणि नालासोपारा येथील जसी डिकॉस्टा या चौघी तरु णी एकमेकांच्या परिचीत असून, ममता ही कॉलसेंटरमध्ये कामाला आहे. मंगळवारच्या पहाटे २ वाजताच्या सुमारास मॅक्सस मॉलसमोरील पालिकेच्या शहिद भगतसिंग मैदानात या चौघी तरु णी आपसात मोठ-मोठ्याने भांडण आणि शिवीगाळ करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक मनिषा पाटील या दोन कर्मचाºयांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचल्या. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. चारही तरूणी दारूच्या नशेत धूडगुस घालत होत्या. दारूच्या नशेत ममता मेयरला धड उभेही राहवत नव्हते. मनिषा पाटील यांनी त्यांना आरडाओरडा करु नका, असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरूणी पोलिसांनाच अर्वाच्च शिवीगाळ करुन दमदाटी देऊ लागल्या. कोकाटे नामक पोलीस कर्मचाºयाच्या अंगावर त्या धावून गेल्या. त्यांच्या हातातील काठी ओढत तरूणींनी त्यांच्या शर्टाची बटनं तोडली. शर्टाला लावलेली त्यांची नावाची पाटी तरूणींनी खेचून कडून, पाटील नामक पोलीस कर्मचाºयाशी धक्काबुक्कीही केली. चारही तरूणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून, एका पोलीस कर्मचाºयाने दंडुक्याने त्यांना बदडवून काढले. दंडुक्याचा प्रसाद मिळू लागताच जसीने पळ काढला. ममता, अलिशा व कमल यांना चोप देऊन पोलिसांनी त्यांच्या गाडीत बसवले.पोलीस ठाण्यातही ममताचा धुडगूस सुरू होताच. पोलिसांनी त्यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणण्यासह शिवीगाळ, दमदाटी आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. ममता, अलिशा आणि कमल या तिघींना अटक केली असून, त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. जसीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.तीन तरुणींची रवानगी न्यायालयीन कोठडीतच्सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही तरूणी सोमवारी रात्री एका पार्टीसाठी गेल्या होत्या. या पार्टीत त्यांनी यथेच्छ मद्य प्राशन केले. पार्टीतून त्या मध्यरात्री भार्इंदरमध्ये परतल्या. तिथे आल्यानंतर त्यांनी धिंगाणा घालण्यास सुरूवात केली. त्याचे कारण मात्र समजले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सुनील बागल या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.च्अटक केलेल्या तीनही तरूणांनी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानुसार भायखळा कारागृहात त्यांना रवाना केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तिघींपैकी एक तरूणी मीरारोड येथील तिच्या नातलगाकडे राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी