लोकमत न्यूूज नेटवर्कठाणे : दोन वेगवेगळ्या वाहनांना बेदरकारपणे धडक देऊन पसार झालेल्या जावेद उर्फ बबलू मुक्तार खान (३२) या चालकाला श्रीनगर पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. अटकेनंतर अपघातग्रस्त कारही त्याने बोरीवलीतून चोरल्याचे उघड झाले. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.वागळे इस्टेट येथे २० डिसेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास जावेदने पार्र्किं गमध्ये उभ्या असलेल्या एका दुधाच्या टँकरसह दोन वाहनांना धडक दिली. यात त्याच्या कपाळाला जखमही झाली होती. त्यानंतर तो पसार झाल्याची माहिती ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षातून श्रीनगर पोलिसांना मिळाली. ती मिळताच श्रीनगर पोलीस त्याचा पिच्छा करीत त्याठिकाणी पोहचले. त्याच्या कपाळाला जखम झाल्याचेही काही पादचाºयांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, त्याने गाडी सोडून तिथून पळ काढला. रोड क्रमांक १६ च्या परिसरात त्याला पोलिसांनी पकडले. तेंव्हा ही गाडीही आपली नसून आपण ती गाडी चालवितही नव्हतो, असा पवित्रा त्याने घेतला. चालतांना पडल्यामुळे जखमी झाल्याची सारवासारवही त्याने केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कारची झडती घेतली, तेंव्हा कारमध्ये बºयाच बनावट चाव्यांसह बनावट चावी बनविण्याची सामुग्रीही मिळाली. कारची कागदपत्रे आणि क्रमांक मात्र खरा होता. तेंव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने मुंबईच्या ताडदेव पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाचा शोध घेतला. तेंव्हा ही कार नावावर असली तरी आपण ती बोरीवलीच्या ग्राहकाला विकल्याचे संबंधित कार मालकाने सांगितले. पण, गाडीची विक्री झाल्यानंतर तिची ६ डिसेंबर रोजी चोरी झाली असून त्याबाबत बोरीवली पोलीस ठाण्यात १२ डिसेंबर २०१७ रोजी तक्रार दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रकार उघड झाल्यानंतर सकाळी अपघाताचा तर सायंकाळी कार चोरीचाही गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल झाला.कार चोरीची योजनाअपघातग्रस्त कारच्या चोरीनंतर आणखी कार चोरण्याची त्याची योजना होती. त्याच कामासाठी त्याचे आणखी दोन साथीदार गुजरात येथून येणार होते. त्यांनाच घेण्यासाठी तो कारने जात होता. पण नशेत टँकरसह दोन वाहनांना त्याच्या कारची धडक बसली आणि तो पकडला गेला. त्याच्याकडून आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.