शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

ब्लॉकमुळे ठाणे, दिवा, मुंब्रा येथील प्रवाशांचे झाले मेगा हाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 7:08 AM

 मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे ते दिवा विभागांतील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या  महत्त्वपूर्ण कामासाठी २ जानेवारी रोजी पहाटे २ ते ३ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत २४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे रविवारी कामानिमित्त कल्याणकडे जाण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे मेगा हाल झाले. अनेकांना द्रविडी प्राणायाम करीत बस, रिक्षांचा आधार घ्यावा लागला. काही प्रवाशांना डोंबिवली आणि कल्याण येथून पुन्हा बस किंवा खासगी वाहनांनी प्रवास करावा लागल्याचे प्रवाशांनी सांगितले.

 मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे ते दिवा विभागांतील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या  महत्त्वपूर्ण कामासाठी २ जानेवारी रोजी पहाटे २ ते ३ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत २४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याण या अप (मुंबईकडे जाणाऱ्या) तसेच डाऊन (कल्याणकडे जाणाऱ्या) मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवल्या होत्या. ज्या सुरू होत्या, त्या जलद मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या. याच कालावधीमध्ये कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर लोकल थांबणार नसल्याचे रेल्वेने जाहीर केले होते. त्यामुळे ठाण्यातून कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांमध्ये उतरणाऱ्या प्रवाशांचे त्यातही लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. 

ज्या महिला ठाकुर्ली किंवा मुंब्रा येथून नातेवाईकांकडे शनिवारी किंवा शुक्रवारी आल्या होत्या, त्यांना परत लहान मुलांना रविवारी आपल्या स्थानकांकडे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.