भिवंडी : बहिणीशी असलेले प्रेमसंबंध तोडण्यासाठी भावाने तीच्या प्रियकरावर हॉटेलमधील चाकूने वार केल्याची घटना निजामपूर भागातील रामभूवन हॉटेलमध्ये घडली.आशिष जयवंत शिगवण(२५)असे जखमी प्रियकराचे नांव असुन तो आपल्या आईवडीलांसोबत शहरातील कापआळी येथे रहातो. त्याचे ठाण्यातील चंदनवाडीतील तरूणी बरोबर प्रेमसंबध आहेत.याचा जाब विचारण्यासाठी तीचा भाऊ ओमकार भूवड हा काल मध्यरात्रीनंतर आपल्या तीन मित्रांबरोबर काप आळीतील अशिष शिगवणच्या घरी आला.त्यांनी आशिष शिगवण यांस चहा नास्त्याच्या बहाण्याने निजामपूर मधील रामभूवन हॉटेलमध्ये नेले.तेथे आपल्या बहिणीशी असलेले प्रेमसंबध तोडून टाकण्यासाठी ओमकार भूवडने आशिषला धमकावले असता आशिषने त्यास नकार दिला. त्याचा राग येऊन ओमकारने हॉटेलमध्ये असलेल्या कांदा चिरण्याची सुरी घेऊन आशिषच्या मानेवर व गळ्यावर सपासप वार केले आणि त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.तेंव्हा घटनास्थळी असलेल्या ओमकार भूवडच्या मित्रांनी जखमी आशिष शिगवण यांस स्व.इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयांत दाखल केले.परंतू त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यास तातडीने शहरातील खाजगी रूग्णालयांत दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी ओमकार भूवड याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली असुन आज दुपारी त्यास भिवंडी न्यायालयांत हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बहिणीच्या प्रियकरावर केले भावाने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:41 PM
भिवंडी : बहिणीशी असलेले प्रेमसंबंध तोडण्यासाठी भावाने तीच्या प्रियकरावर हॉटेलमधील चाकूने वार केल्याची घटना निजामपूर भागातील रामभूवन हॉटेलमध्ये घडली.आशिष जयवंत शिगवण(२५)असे जखमी प्रियकराचे नांव असुन तो आपल्या आईवडीलांसोबत शहरातील कापआळी येथे रहातो. त्याचे ठाण्यातील चंदनवाडीतील तरूणी बरोबर प्रेमसंबध आहेत.याचा जाब विचारण्यासाठी तीचा भाऊ ओमकार भूवड हा काल मध्यरात्रीनंतर आपल्या तीन ...
ठळक मुद्देचहा नास्त्याच्या बहाण्याने आरोपीने प्रियकरास नेले हॉटेलमध्येबहिणीशी असलेले प्रेमसंबंध तोडण्यासाठी भावाने केली जबरदस्तीकांदा चिरण्याच्या सुरीने केले मानेवर व गळ्यावर वार