शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

ठेकेदाराच्या ‘शिवशाही’ने प्रवाशांची झोप उडाली, चालकांना पुरेशी विश्रांती नसल्याच्या तक्रारीमुळे भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:36 AM

ठाणे-कोल्हापूरदरम्यान धावणा-या ‘शिवशाही’ चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने १५ दिवसांपूर्वी या बसच्या चालकाने लोणावळा येथे बस बाजूला उभी करून चक्क झोप काढल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

ठाणे : ठाणे-कोल्हापूरदरम्यान धावणा-या ‘शिवशाही’ चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने १५ दिवसांपूर्वी या बसच्या चालकाने लोणावळा येथे बस बाजूला उभी करून चक्क झोप काढल्याचे धक्कादायक वृत्त आहे. एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांनी या वृत्ताचा इन्कार केला असला, तरी या पार्श्वभूमीवर पाच शिवशाही ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. यापैकी तीन बस ठाणे ते बोरिवली मार्गावर सोमवारपासून धावण्यास प्रारंभ झाला.हळूहळू या मार्गावर सर्व शिवशाही बस सोडण्यात येणार असल्याचे विभागीय नियंत्रक अविनाश पाटील यांनी सांगितले. ठाणे बस आगारासाठी १२ शिवशाही बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील दोन कोल्हापूरसाठी, तर तीन ठाणे ते बोरिवली या मार्गावर सोडण्यात येतील. घोडबंदरच्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवशाही २० मिनिटांच्या अंतराने सोडल्या जातील. स्टेशनहून सुटणाºया या शिवशाहीसाठी ४८ रुपये भाडे असून जलद धावणाºया या बसमध्ये कंडक्टर नसेल, असे पाटील यांनी सांगितले. ठाणे- बोरिवली मार्गावरील सेमीलक्झरी काही दिवसांनी बंद होतील. त्यामुळे आणखी १० शिवशाहीची मागणी नोंदवण्यात आली आहे.कोल्हापूरला जाणाºया चालकाने झोप काढल्याची रंगली चर्चा-ठाणे ते कोल्हापूरदरम्यान धावणाºया शिवशाही बस या खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसवरील चालक ठेकेदार कंपनीचे आहेत. या खाजगी कंपन्यांच्या चालकांना सतत ड्युटी करावी लागत असल्यामुळे त्यांना झोप मिळत नसल्याचे सांगितले जाते.त्यामुळे १५ दिवसांपूर्वी एका चालकाने लोणावळा येथे बस रस्त्याच्या बाजूला लावून झोप काढली. त्यानंतर, तो कोल्हापूरकडे बस घेऊन गेल्याचे वृत्त आहे. मात्र, अशी कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. काही लोक नाहक चुकीची माहिती पसरवत आहेत. या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा विभागीय नियंत्रक पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईthaneठाणे