शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

इलेक्शन ड्युटीमुळे केडीएमसीत शुकशुकाट

By admin | Published: May 24, 2017 12:56 AM

भिवंडी महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी अशा सुमारे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : भिवंडी महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी अशा सुमारे साडेपाचशे जणांना इलेक्शन डयुटी लावली आहे. त्यामुळे मंगळवारपासूनच महापालिकेत शुकशुकाट पसरला असून मतमोजणीच्या दिवसांपर्यंत म्हणजेच शुक्रवारपर्यंत हे चित्र राहणार आहे. याआधी उल्हासनगर आणि वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठीही केडीएमसीचे कर्मचाऱ्यांना बोलावले होते. भिवंडीसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील, प्रभारी सचिव संजय जाधव आणि सहायक आयुक्त विनय कुलकर्णी या प्रमुख अधिकाऱ्यांसह अभियंते, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, लिपीक, शिपाई, कामगार, सफाई कर्मचाऱ्यांना इलेक्शन डयुटी लावण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मंगळवारपासूनच भिवंडीला गेल्याने दालने रिकामी पडली आहेत. ही परिस्थिती शुक्रवारपर्यंत राहणार आहे. इलेक्शन डुटी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर देखील याचा परिणाम झाला आहे. विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकारी, कर्मचारी नसल्याने परत जावे लागत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठीही पालिका कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. मात्र, याचा फटका सामान्यांना बसतो.