डोंबिवली - श्री गणेश मंदिर संस्थान व नववर्ष स्वागतयात्र संयोजन समिती यांच्यातर्फे आयोजित केलेल्या नववर्ष स्वागतयात्र ‘माझी अपेक्षा माझी कर्तव्ये आणि डिजीटल इंडिया ’ या थीमवर आधारित असणार आहे. यंदाच्या वर्षी नागरिकांपर्यत डिजीटली पोहोचण्याचा संस्थानचा विचार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आठ दिवस आधीपासूनच भरगच्च अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. -10 मार्च रोजी दुपारी 1 वाजता वेबिनार या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात विकासाचे महामार्ग-तरूणांच्या संकल्पना या विषयावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी डोंबिवलीतील तरूणांशी 15 ठिकाणी ऑनलाईन मार्गदर्शनसह संवाद साधतील. सायंकाळी 5 वाजता वक्रतुंड सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रतील महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. महिला आर्थिक गुंतवणूकीबाबत ‘मी व माङो आर्थिक स्वावलंबन’ यावर आर्थिक क्षेत्रतील तज्ञ स्नेहल दिक्षीत मार्गदर्शन करणार आहेत.-11 मार्च रोजी श्री गणोश मंदिर संस्थानात सकाळी 6 वाजता सामुदायिक काकड आरती, 7 वाजता श्री अथर्वशीर्ष आवर्तनं, ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात सायंकाळी 6 वाजता अथर्वशीर्ष आवर्तनं, रात्री 9.45 वाजता सामुदायिक शेजारती विडा हा कार्यक्रम होईल. -12 मार्च रोजी दुपारी 4 वाजता अत्रे ग्रंथालय, टिळक पथ, डोंबिवली (पूर्व) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजीटल अवरनेस वर्कशॉप, मरकडेय मंदिर, सागर्ली येथे सायंकाळी 7 वाजता शिवोपसना अथर्वशीर्ष पठण होणार आहे. -13 मार्च रोजी श्री गणोश मंदिर संस्थानात सायंकाळी 5 ते 6 सूक्तपठण, सायंकाळी 6 ते 7 दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. -14 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत ज्येष्ठ नागरिक वकृतत्व स्पर्धा, सायंकाळी 5.30 वाजता वक्रतुंड सभागृहात ज्येष्ठ नागरिक कायदा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी माजी पोलिस उपायुक्त वाय. सी. पवार, फेस्कॉम अध्यक्ष रमेश पारखे मार्गदर्शन करतील. सायंकाळी 7 ते 8 या वेळेत ज्येष्ठ नागरिक सभागृह, रिजन्सी इस्टेट येथे अथर्वशीर्ष आवर्तनं होणार आहेत. -15 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत त्रिमूर्ती दत्तमंदिर, गणोशनगर येथे अथर्वशीर्ष आवर्तनं होणार आहेत. -16 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता वक्रतुंड सभागृहात महापालिका मालमत्ता करांबाबत चर्चासत्र घेण्यात येणार आहे. या चर्चासत्रत केडीएमसी अधिकारी सहभागी होतील. गावदेवी मंदिरात सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अथर्वशीर्ष आवर्तनं होतील. -17 मार्च रोजी सकाळी 7 वाजता श्री गणोश मंदिर संस्थान येथे योगासने प्रात्याक्षिक व अभ्यास होणार आहेत. कान्होजी जेधे मैदान, भागशाळा येथे सायंकाळी 5.30 वाजता संभाजी महाराज बलिदान दिन शारीरीक प्रात्याक्षिके होणार आहेत. यावेळी समर्थसेवा मंडळाचे प्रमुख स. भ. योगेशबुवा रामदासी उपस्थित राहणार आहेत. ते यावेळी युवकांना मार्गदर्शन करतील. रोटरी क्लब डोंबिवली वेस्ट व गणोश मंदिर संस्थानच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 9 वाजता आप्पा दातार चौकात जगतगुरू भारत या विषयावर माजी आय.ए.एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करतील. 17 ते 25 मार्च या कालवधीत सकाळी 6 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत श्रीरामनामजपयज्ञ श्री गणोश मंदिर संस्थानात होणार आहे. -24 मार्च रोजी मंदिरात श्रीरामरक्षा पठण आणि 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीरामनामजप सांगता समारंभ होणार आहे.
डोंबिवली : नववर्षाच्या स्वागतासाठी भरगच्च कार्यक्रम, ढोलताशा पथकांच्या आवाजांवर मर्यादेचे बंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 6:16 PM