शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

पुरामुळे ठाणे जिल्ह्यात झाली लाखोंची हानी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 2:19 AM

पूरग्रस्तांचे तीन हजार पंचनामे पूर्ण : राबोडीत इमारतीचा

ठळक मुद्देभाग कोसळला, उल्हासनगरला ११० घरांमध्ये पाणी

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार या पूरपरिस्थितीच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सोमवारपासून करण्यास प्रारंभ केला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत दोन हजार ७१५ पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील या घरांसह शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदारांकडून सुरू आहेत. याप्रमाणेच सोमवारी दुपारीही राबोडीतील इमारतीचा भाग कोसळला, तर उल्हासनगरमध्ये ११० घरांमध्ये पाणी शिरले आहे.

जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर वाढला होता. यादरम्यान राबोडी येथील पंचगंगा इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या इमारतीत रहिवासी असतानाही हा भाग कोसळला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील अशोक पाटील कॉलनीत सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे ११० घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल झाले. कल्याण तालुक्यातील रायता गावाजवळील दिनेशकुमार ढेरिया यांच्या डेअरी फार्ममधील १६ गायी, सात वासरे आदी सुमारे २९ जनावरे शुक्रवारच्या रात्री पुरात वाहून गेले आहेत. त्यांचे मृतावशेष मिळाले नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून स्पष्ट करण्यात आले.बदलापूर शहरात सर्वाधिक नुकसानया पूरपरिस्थितीच्या कालावधीत अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरास सर्वाधिक फटका बसला आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे रहिवाशांना जीवघेण्या समस्येला तोंड द्यावे लागले. याप्रमाणेच उल्हासनगरमधील वालधुनी नदीकाठावरील घरांमध्येदेखील पुराचे पाणी शिरले आहे. तर, कल्याण, भिवंडीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुरबाड, शहापूर तालुक्यांतही नदीकाठालगतच्या भातशेतीचे नुकसान झाले. या पूरस्थितीच्या दोन दिवसांच्या कालावधीत लाखो रुपयांचे नुकसान सद्य:स्थितीत दिसून येत आहे. यांचे नुकसानभरपाईच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे आदेश जारी झाले. त्यानुसार, संध्याकाळपर्यंत दोन हजार ७०० पेक्षा अधिक पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्याचे आढळून आले.अंबरनाथमध्ये शेकडो एकर शेतजमीन पाण्याखालीअंबरनाथ तालुक्यातील रेल्वेच्या काकोळे धरणातील पाणी खालच्या बंधाऱ्यात शिरून ब्रिटिशकालीन भिंतीला भगदाड पडले. यामुळे या परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यासारखे शेतीनुकसानीसह घरांच्या पडझडीचे पंचनामे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसीलदार यंत्रणेकडून पंचनाम्यास प्रारंभ केला आहे. अंबरनाथ तालुक्यात आतापर्यंत एक हजार ५०० पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे सुरू आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यात ९७० पंचनाम्यांचे काम झाले. भिवंडीत आतापर्यंत २४५ पंचनामे संध्याकाळपर्यंत झाले. महसूल विभागाकडून युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुक्यांमध्ये सुरू आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbaiमुंबई