शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
2
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
3
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
4
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
5
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
6
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
8
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
9
IND vs AUS: डेव्हिड वॉर्नरला पर्याय सापडला! भारताविरूद्ध 'हा' असेल ऑस्ट्रेलियाचा 'ओपनर'
10
Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 
11
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
12
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
13
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
14
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
15
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
16
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
17
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
18
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
20
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू

दमदार पावसामुळे चिखलोली धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:12 AM

अंबरनाथमधील चिखलोली धरण मंगळवारी सकाळपासून भरून वाहू लागले आहे. मागील आठवड्याभरापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे धरण काही दिवसातच भरले आहे.

अंबरनाथ : अंबरनाथमधील चिखलोली धरण मंगळवारी सकाळपासून भरून वाहू लागले आहे. मागील आठवड्याभरापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे धरण काही दिवसातच भरले आहे. या धरणातून बाहेर पडणाºया पाण्याच्या ओढयावर भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.अंबरनाथमध्ये शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण भरून वाहू लागले आहे. या धरणातून अंबरनाथ पूर्व भागात रोज सहा दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्यात या धरणात कंपन्यांचे रसायन गेल्याने हे पाणी दूषित झाले होते. त्यामुळे या धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्यावर पाण्याची पातळी वाढल्याने दूषित पाण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर या धरणातील पाण्याचा नागरिकांसाठी पुन्हा पुरवठा सुरू करण्यात आला. तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने धरण भरून वाहू लागले आहे. दरम्यान, या ठिकाणी येणाºया पर्यटकांना धरण पात्रात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे.गाडी अडकलीअंबरनाथ : बेलवलीतील भुयारी मार्गात सोमवारी गाडी अडकली होती. स्थानिकांनी प्रवाशांची सुखरुप सुटका केली. नियोजन न करता हा मार्ग बांधल्याने येथे कायमच पाणी असते. पावसाळ््यात त्यामध्ये वाढ होते. तरीही रेल्वे हा मार्ग बंद करत नाही.जोरदार पावसामुळे बिरवाडी पूल वाहतुकीसाठी बंदमुरबाड : तालुक्यातील बिरवाडी, मासले, बेलपाडा, फणसवाडी, शिखरपाडा, उंबरवेढे या गावांना जोडणाºया बिरवाडी नदीवरील नवीन पुलाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ट असल्याने येथून वाहतूक सुरू नव्हती. तर जुन्या पुलावरूनच वाहने ये - जा करत होती. आता हा जुना पूल नादुरूस्त झाला आहे तसेच त्याची संरक्षण भिंत जोरदार पावसामुळे वाहून गेली आहे. त्यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. परिणामी, नागरिकांना १५ किमी.ची पायपीट करावी लागते आहे. मुरबाड - कल्याणकडे जाणाºया चाकरमान्यांना तसेच विद्यार्थ्यांना बेलपाडा या गावातून जावे लागत आहे.तरूणाचा मृत्यूभिवंडी : शहरातील चाविंद्रा भागातील अवचितपाडा येथे एक मजली घराचे प्लास्टर तेथे झोपलेल्या सैजू दासन पुत्तलतोडी (२८) याच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे नव्हती. झमझम हॉटेल शेजारी एकमजली घर व तळमजल्यावर किराणा दुकान आहे. दुकानाजवळील घरात तो आपल्या साथीदारांसह राहत होता. सोमवारी रात्री तो दुकान बंद करून झोपला असता त्याच्या घराच्या प्लास्टरचा काही भाग मंगळवारी पहाटे त्याच्या अंगावर कोसळला.उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलाउल्हासनगर : संततधार पावसामुळे वालधुनीला पूर आल्याने अनेक झोपडपट्टयात पाणी शिरले. तर शांती पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळल्याने ती रिकामी करून सील केली. गोलमैदान, शांतीनगर, शहाड फाटक, मयूर हॉटेल, नेहरू चौक आदी परिसरात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले होते.कॅम्प नं-२ खेमानी येथे पाच मजली शांती पॅलेस इमारत आहे. महापालिकेने इमारतीला यापूर्वीच धोकादायक म्हणून जाहीर केले.रात्री ११ च्या दरम्यान इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडून ते पळू लागले. मंगळवारी सकाळी ११ वाजता आयुक्त गणेश पाटील यांच्यासह प्रभाग अधिकारी भगवान कुमावत, गणेश शिंपी यांनी इमारतीची पाहणी करून २३ कुटुंबांनाचे साहित्य बाहेर काढण्याची परवानगी देत इमारत सील केली. वालधुनी नदीचे पाणी अयोध्यानगर, पंचशीलनगर, मातोश्री मीनाताई ठाकरेनगर, रेणूका सोसायटीमधील झोपड्यांमध्ये शिरले. तीन ते चार ठिकाणी झाडे उन्मळून पडली.दरम्यान, या घटनेने धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.नागरिकांसाठी मीरा रोडमध्ये बोटसेवा सुरूचमीरा रोड : मुसळधार पावसामुळे मंगळवारीही मीरा-भार्इंदरमध्ये पूरिस्थती कायम राहिली. अनेक भागातील टाक्यांमध्ये सांडपाणी गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मीरा रोडच्या सिल्वर सरिता भागात मंगळवारीही अग्निशमन दलाने बोटसेवा चालवली.उत्तनच्या नवीखाडी, करईपाडा, पाली भागात धावगी डोंगरावरून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात साचले. सकाळपासूनच या भागातील बस व अन्य वाहनसेवा बंद झाली. मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी पाणी साचण्याच्या कारणाचा शोध घेतला असता पालीबीच रिसॉर्टजवळील नैसर्गिक नाला हा पूर्णपणे भराव करून बंद केल्याचे निदर्शनास आले. डोंगरावरून येणारा पाण्याचा लोंढा हा पालीगाव व पालीबीच येथील दोन्ही नाल्यातून समुद्रात जायचा. पण पालीबीच येथील नाला बंद झाल्याने पाण्याचा लोंढा पाली, करईपाडा, नवी खाडीकडे वळून मोठ्या प्रमाणात पाणी साचले.मीरा रोडच्या सिल्वर सरिता भागात कमरे इतके साचलेले पाणी आजही ओसरले नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाने रहिवाशांसाठी बोटसेवा सुरू ठेवली. 

टॅग्स :Damधरणthaneठाणे