कल्याण : जुना पत्रीपूल पाडल्याने सध्या नव्या अरुंद पुलावरून वाहतूक सुरू आहे. दिवसा प्रवेशबंदी असूनही अवजड वाहने घुसखोरी करत आहेत. शाळा सुरू झाल्याने स्कूलबसचीही यात भर पडल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असून विद्यार्थी आणि नागरिकांना फटका बसत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पुलावर घुसखोरी करणाऱ्या अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.कल्याणचा जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला आहे. हा पूल नव्याने बांधून वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत वाहतूककोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. या पुलाचे काम ३० डिसेंबरला सुरू झाले असून ते मंदगतीने सुरूआहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास २०२० चा मार्च उजाडणार आहे. हा पूल डिसेंबर २०१९ अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने कामाची गती वाढवा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एका पाहणी दौºयानिमित्त दिले. दहा महिन्यांपासून या पुलावर होणाºया कोंडीने नागरिक आणि वाहनचालक प्रचंड त्रस्त आहेत.एप्रिलपासून शाळांना सुट्या लागल्याने पुलावरून जाणाºया स्कूलबस, विद्यार्थ्यांना नेआण करणाºया रिक्षा व व्हॅन यांचा ताण नव्हता. मात्र, १७ जूनपासून या वाहनांचीही गर्दी पुन्हा वाढली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी वाहतूककोंडीमुळे विद्यार्थ्यांना लेटमार्क लागला. उशीर झाल्यास शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शिक्षा करते.त्यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे यांनी सकाळी ६.३० ते ८.३० वाजता, दुपारी १२ ते १.३० आणि सायंकाळी ५.३० ते ८ या वाहतूककोंडीच्या वेळेत जड व अवजड वाहनांना प्रवेश दिला जाऊ नये. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होऊ न विद्यार्थी आणि नागरिकांना त्याचा फटका बसणार नाही. अवजड वाहनांना पुलावर दिवसा प्रवेशबंदी असूनही त्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून होत नसल्याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास समस्या आणखी गंभीर होईल.‘वाहतूक पोलिसांनी येथे लक्ष द्यावे’कल्याण दुर्गाडी ते पत्रीपूल या गोविंदवाडी बायपासवरून वाहने पत्रीपुलाच्या दिशेने येऊन पत्रीपुलावरून मार्गक्रमण करतात. तसेच डोंबिवली-ठाकुर्ली मार्गे समांतर रस्त्याने व खंबाळपाडा रोडवरील चौधरी कम्पाउंडपासून कचोरेमार्गे वाहने पत्रीपुलाकडे येतात. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते.गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील महापालिकेने बांधलेला पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक आहे. मात्र, या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष करून यामार्गे भिवंडीहून कल्याणच्या दिशेने येणारी वाहने पत्रीपुलाकडे येतात. याकडेही वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
अवजड वाहनांमुळे पत्रीपुलावर होतेय कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:59 PM