ठाणे : उन्हाळी सुट्यांचा कालावधी लवकरच सुरू होत आहे. यादरम्यान गावी जाणाऱ्या ठाणेकरांना येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने लांब पल्ल्यांच्या प्रवासाकरिता यंदा १८ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी सुमारे २८ बसेस सोडल्या होत्या. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे यंदा जादा बसेसची संख्या घटल्याचे सांगितले जात आहे. शाळांना सुट्या लागताच या १८ जादा बसेस १४ एप्रिलपासून रस्त्यावर धावणार आहेत. ठिकठिकाणच्या बस आगारांतून सुटणाऱ्या या बसेस प्रवाशांच्या माागणीनुसार वाढण्याची शक्यता आहे. ठाणे येथून उस्मानाबाद, उमरगा, उमरगे, पारनेर या शहरांसाठी बसेस सुटणार आहेत. मुंब्रा येथून मुरूडला जादा बस जाईल, तर भिवंडी येथून शेगाव-कोल्हापूरसाठी बसेस जातील. बोरिवली आगारातून त्र्यंबकेश्वरसाठी तीन जादा बसेस धावणार आहेत. (प्रतिनिधी)
लांब पल्ल्यांच्या जादा बसेस घटल्या
By admin | Published: April 10, 2017 5:42 AM