उल्हासनगर : दीड महिन्याच्या कालावधीत २० पेक्षा जास्त इमारतींचे स्ल्ॉब पडणे, इमारती कोसळण्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातून जुन्या इमारतीच्या फेरसर्वेक्षणाची मागणी होत असून १९९० ते ९५ दरम्यान वालवा रेती व दगडी चुऱ्यापासून बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारती धोकादायक झाल्या आहेत.उल्हासनगरमध्ये बांधकामांचे सर्व नियम डावलून बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यातील ९० टक्के इमारतीला पूर्णत्वाचा दाखला नसून त्याची नोंदणी २० ते १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर झाली आहे. १९९० ते ९५ दरम्यांन रेती पुरवठा बंद असल्याने, शहरात वालवा रेती व दगडी चु-यातून इमारती बांधण्यात आल्या. मात्र वालवा रेती व दगडी चुºयातून बांधलेल्या बहुतांश इमारती धोकादायक होत आहे.|महापालिकेने २३५ पेक्षा जास्त इमारती धोकादायक तर २१ अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. मात्र जाहीर झालेल्या इमारतींऐवजी इतर इमारती कोसळत आहे. यामुळे धोकादायक इमारतींच्या यादीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. या प्रकरामुळे इमारतींचे पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे.महेक इमारतीची ए विंग मंगळवारी कोसळून ३१ कुटुंब बेघर झाली. तर बी विंगबरोबरच इतर तीन इमारती सुरक्षेचा उपाय म्हणून रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे १०३ कुटुंब बेघर झाली असून महापालिकेने त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र त्यांनी नातेवाईक व भाडयाच्या घरात राहणे पसंत केले.गेल्याच आठवडयात दोन इमारतींचे स्लॅब पडल्याने रिकाम्या करून सीलबंद केल्या आहेत. त्यापूर्वी पवई चौकातील एका इमारतीचा स्लॅब पडून चार वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. ४० दिवसात २० पेक्षा स्लॅब पडणे, इमारत कोसळणे, प्लास्टर पडणे, इमारतीला तडा जाणे आदी घटना घडल्याची माहिती एका प्रसिध्द वास्तूविशारदाने दिली.जीव मुठीत घेऊन हजारो नागरिकांचे वास्तव्यशहरात शेकडो धोकादायक इमारती असून यामध्ये हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. धोकादायक इमारतंबाबत सरकारने तसेच महापालिका प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन ४ चटई क्षेत्राची मागणी केली आहे. इमारतीला वाढीव चटईक्षेत्र दिल्यास त्यांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होणार आहे.या इमारती पडल्याशहरातील सनमुख सदन, गुडमॅन कॉटेज, माँ भगवंती, नीलकंठ, शीशमहल, शांती पॅलेस, माँ महालक्ष्मी, राणी माँ, शिवसागर, लक्ष्मीसागर, साई आसाराम आदी ३५ इमारती १० वर्षात पडून २५ पेक्षा जास्त जणांचे बळी गेले.सुरूवातीला अपघातातील मृतांच्या कुटुंबाला पालिकेकडून आर्थिक मदत दिली जात होती. मात्र आतातर महापालिकेने मदत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
निकृष्ट बांधकामामुळे इमारती धोकादायक, २५ पेक्षा जास्त जणांचा गेला बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 2:38 AM